Rahu Gochar: राहू सध्या कुंभ राशीत भ्रमण करत आहे. मात्र, ५ डिसेंबरपासून राहू मकर राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या गोचराचा काही राशींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काही राशींना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया, राहूचे हे गोचर कोणत्या ४ राशींसाठी शुभ ठरणार आहे.
कर्क रास: आर्थिक स्थितीत सुधारणा होईल
कर्क राशीच्या लोकांसाठी राहूचे हे गोचर लाभदायक ठरणार आहे. व्यावसायिक प्रवास यशस्वी होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. राहूमुळे तुमची लोकप्रियता वाढेल. तसेच उत्पन्नातही वाढ होईल. निर्णय घेण्याची क्षमता अधिक मजबूत होईल आणि धाडसही वाढेल.
सिंह रास: नोकरीतील स्थान अधिक मजबूत होईल
सिंह राशीच्या लोकांसाठी राहूचे गोचर सकारात्मक ठरणार आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. नोकरीतील तुमचे स्थान अधिक मजबूत होईल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हे गोचर यशाची नवीन दारे उघडू शकते. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. जुने कर्ज फेडण्यातही यश मिळू शकते.
तूळ रास: अचानक मालमत्तेचा लाभ होण्याची शक्यता
तूळ राशीच्या लोकांसाठी राहूचे गोचर खूप शुभ ठरणार आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. या काळात अचानक मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. सासरच्या मंडळींकडून सहकार्य आणि आनंद मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. खर्च कमी होतील. नवीन नोकरी मिळण्याचेही संकेत आहेत.
वृश्चिक रास: व्यवसायात चांगली प्रगती होईल
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी राहूचे गोचर शुभ ठरणार आहे. तुमचे धाडस वाढेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. नवीन मित्र जोडले जातील. विशेषतः कम्युनिकेशन, मीडिया, मार्केटिंग आणि लेखन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. उत्पन्नात वाढ होईल. मेहनतीच्या जोरावर आर्थिक स्थिती सुधारण्यात यश मिळेल. अनेक दिवसांपासून परदेश प्रवासाची वाट पाहत असाल, तर राहूमुळे ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्यातिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
