रस्त्यावर पैसे सापडल्यास आवर्जून करा ‘ही’ गोष्ट; बदलेल तुमचे नशीब

जाणून घेऊया, रस्त्यावर पडलेले पैसे आपल्याला काय संदेश देत असतात?

money on the street
रस्त्यावर पडलेले पैसे पाहून ते न उचलता पुढे गेल्याने लक्ष्मीचा अपमान होतो, असे आपल्याकडे सांगितले जाते. (प्रातिनिधिक फोटो)

अनेकदा काही कामानिमित्त आपण घराबाहेर पडतो आणि आपल्याला रस्त्यावर पैसे पडलेले दिसतात. काही लोक हे पैसे उचलून स्वतःकडे ठेवतात, काही लोक हे पैसे मंदिरातील दानपेटीमध्ये टाकतात, तर काही लोकं या पैशांकडे दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहित आहे का की असे रस्त्यावर पडलेले पैसे आपल्याला काय संदेश देत असतात? याबाबत जाणून घेऊया आजच्या लेखात.

>> हिंदू धर्मात पैशांना लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. अशातच रस्त्यावर पडलेले पैसे पाहून ते न उचलता पुढे गेल्याने लक्ष्मीचा अपमान होतो. म्हणूनच रस्त्यावर पडलेले पैसे मिळाल्यास त्यांचा अनादर करू नये असे आपल्याकडे सांगितले जाते.

या राशीच्या मुलींना मिळतो चांगला नवरा, जाणून घ्या तुमच्या राशीचा यात समावेश आहे का?

>> घरातून निघाल्यावर पैसे मिळणे आणि घरी परतताना पैसे मिळणे या गोष्टींचे वेगवेगळे अर्थ आहेत. जर आपल्याला घरातून निघाल्यावर नोट किंवा नाण्यांच्या रूपात पैसे मिळाले असतील तर त्यांना ऑफिस किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी ठेवून द्यावे. हे पैसे खर्च करू नये.

>> तेच जर ऑफिस, कामाच्या ठिकाणाहून किंवा महत्त्वाचे काम करून घरी परतताना आपल्याला रस्त्यात पडलेले पैसे सापडले तर शास्त्रांनुसार या पैशांची बचत करावी. तथापि, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की ते कमाईच्या पैशामध्ये समाविष्ट केले जाऊ नये. याच्या मागचे कारण म्हणजे रस्त्यावर सापडलेले पैसे आपल्या कमाईच्या पैशांमध्ये मिसळले तर अनावश्यक खर्च वाढू लागतो. हे पैसे तुम्ही तुमच्या डायरीमध्ये किंवा लिफाफ्यात गुंडाळून ठेवू शकता.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Definitely do this if you find money on the street your destiny will change pvp

Next Story
आजचं राशीभविष्य, शनिवार, १५ जानेवारी २०२२
फोटो गॅलरी