2 December, Zodiac Signs Daily Horoscope : आज २ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देव दिवाळी आहे. या दिवशी देव-देवतांची दिवाळी असते. यादिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने साधकाचे सर्व दु:ख, संकटे दूर होतात असे मानले जाते. तर आज मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर द्वितीया तिथी सुरु होईल. त्याचप्रमाणे धृति योग संध्याकाळी ४ वाजून १ मिनिटांपर्यंत राहील. तर ज्येष्ठ नक्षत्र दुपारी ३ वाजून ४६ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तसेच राहू काळ ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असेल. याशिवाय आज सायंकाळी ७ वाजून ०८ मिनिटांनी सूर्य ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश करेल. तर देव दिवाळी तुमच्या राशीसाठी कशी जाईल हे आपण जाणून घेऊया…

२ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- अवांछित खर्च सामोरे येऊ शकतात. बहु राष्ट्रीय कंपनीत काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल. डोळ्यांची काळजी घ्यावी. मनात नसत्या शंका आणू नका. मनाच्या चंचलतेला आवर घालावी.

Grah Gochar 2025 shukra gochar purva bhadrapad nakshatra
Grah Gochar 2025 : १ फेब्रुवारीपर्यंत फळफळणार ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब; शुक्राच्या नक्षत्र बदलाने संपत्तीत होईल प्रचंड वाढ, नांदेल सुख समृद्धी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
meen Rashi Bhavishya 2025 in Marathi
Pisces Yearly Horoscope 2025: २०२५ मध्ये ‘या’ राशीच्या मेहनतीचे होईल चीज! अनेक समस्यांमधून होईल सुटका; सोनल चितळेंकडून १२ महिन्यांचे राशिभविष्य जाणून घ्या
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
shukra-shani Yuti
तब्बल ३० वर्षानंतर निर्माण होणार धनाढ्य योग! शनि-शुक्राच्या युतीने ‘या’ तीन राशींवर धन-सुखाची बरसात; व्यवसायातून मिळेल बक्कळ पैसा
The effect of the Sun's Mahadasha lasts for 6 years on a person
Surya Mahadasha: सूर्याच्या महादशेमुळे कोणत्या राशींचे नशीब चमकते करिअर अन् व्यवसाय? मिळते अपार धन-संपत्ती, ६ वर्षांसाठी राहतो प्रभाव
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख
Dhanu Rashi Bhavishya 2025 in Marathi
Sagittarius Yearly Horoscope 2025 : धनु राशीच्या आयुष्याचे होणार सोने! आर्थिक लाभ, मोठे प्रकल्प तर रखडलेली कामे होतील पूर्ण; सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे भविष्य

वृषभ:- आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. भावंडांसोबत दिवस मजेत घालवाल. मित्रांमध्ये तुमची प्रशंसा केली जाईल. आवडीची खरेदी केली जाईल.

मिथुन:- कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील. दिवसभर कामाची धांदल राहील. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. आर्थिक गणित सोडवता येईल. वरिष्ठ नवीन जबाबदारी देऊ शकतात.

कर्क:- धार्मिक बाबीत रस घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनातील समस्या दूर कराव्यात. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. धार्मिक स्थळाला भेट द्याल.

सिंह:- जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. पोटाचे विकार संभवतात. मनातील भलत्या चिंता बाजूला साराव्यात. अचानक लाभाची शक्यता. त्रासदायक गोष्टींपासून लांब राहावे.

कन्या:- जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. संध्याकाळी एखादे सरप्राइज मिळेल. भागीदारीत चांगला नफा मिळेल. जनसंपर्कात वाढ होईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

तूळ:- इतरांच्या बोलण्याचा मनावर परिणाम होऊ शकतो. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. उगाचच चिडचिड होऊ शकते. आत्मविश्वास सोडून चालणार नाही. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे.

वृश्चिक:- आजोळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. आपले छंद जोपासावेत. प्रेमातील लोकांना एकत्र वेळ घालवता येईल. जुगारातून लाभ संभवतो.

धनू:- कौटुंबिक जीवनात चांगले बदल होतील. घरातील ज्येष्ठांची सेवा करता येईल. अधिक वेळ घरगुती कामात घालवाल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण करता येईल. जवळचा प्रवास सुखाचा होईल.

मकर:- आपल्यातील सकारात्मक ऊर्जेचा वापर करावा. रखडलेली कामे तडीस नेता येतील. लहान भावंडांचा हातभार लागेल. प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल. अचानक जुने मित्र भेटतील.

कुंभ:- सांपत्तिक स्थिती सुधारेल. इतरांना बोलण्यातून जिंकू शकाल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. व्यापारी वर्ग खुश असेल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल.

मीन:- आज लोक तुमच्यावर व्यक्तिमत्वावर आकर्षित होतील. विश्वासू मित्रांची साथ घ्यावी. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. लोकांवर तुमची चांगली छाप पडेल. प्रेमळपणे सर्वांच्या मनात घर कराल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader