Guru Gochar 2026 Impact : वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, वैभव व विवेक यांचा कारक मानले जाते. गुरू हा सर्वांत शुभ ग्रहांपैकी एक मानला जातो आणि त्यामुळे तो जेव्हाही रास बदलतो, तेव्हा सर्व राशींवर त्याचा परिणाम दिसून येतो. ३१ ऑक्टोबर रोजी गुरू ग्रह कर्क रास सोडून सिंह राशीत गोचर करेल आणि २५ जानेवारी २०२७ पर्यंत याच राशीत राहील. गुरूच्या या गोचरामुळे कोणत्या राशींना जीवनात शुभ परिणाम मिळतील आणि कोणत्या राशींना सावधगिरी बाळगावी लागेल, हे सविस्तर जाणून घेऊया.
सर्व १२ राशींवर गुरू गोचराचा प्रभाव:
मेष: गुरूच्या या गोचरामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे यश मिळू शकते. नशिबाचीही पूर्ण साथ लाभेल. करिअरमध्ये उत्तम प्रगती करू शकाल.
वृषभ: गुरूच्या गोचरामुळे कौटुंबिक जीवनात सुख-समाधान लाभेल, काही तसेच लोक स्वतःचे नवीन घरदेखील खरेदी करू शकतात. आईसोबत चांगला वेळ व्यतीत करू शकांल.
मिथुन: गुरूचे गोचर तुमच्यासाठी संमिश्र फळे देणारे ठरेल. कौटुंबिक जीवनात चांगला वेळ घालवू शकाल. भावंडांचे सहकार्य लाभेल. अतिउत्साहात येऊन कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळावे.
कर्क: गुरू ग्रहाच्या गोचरामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. नशिबाची साथ मिळेल. जर तुम्ही वडिलोपार्जित व्यवसाय करत असाल, तर मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.
सिंह: ३१ ऑक्टोबरपासून गुरूचा सिंह राशीवर शुभ परिणाम दिसून येईल. तुमची बौद्धिक क्षमता वाढेल. तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकाल आणि समाजात मान-सन्मानदेखील प्राप्त होईल. नशिबाचे तारे उजळतील.
कन्या: गुरूच्या या गोचरादरम्यान तुम्हाला आर्थिक बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. मात्र, जे लोक परदेशी कंपन्यांमध्ये काम करतात, त्यांना चांगला लाभ मिळू शकतो.
तूळ: गुरूच्या गोचराने तुम्हाला जीवनात भरपूर नफा मिळू शकतो. या राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत प्राप्त होऊ शकतात.
वृश्चिक: गुरू हे गोचर तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात मोठे यश मिळवून देणारा ठरेल. काही लोकांना पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.
धनु: गुरू हे तुमच्या राशीचे स्वामीदेखील आहेत. त्यामुळे नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल.
मकर: गुरूच्या गोचरामुळे संशोधन (शोधकार्य) क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळू शकेल. तसेच मकर राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल.
कुंभ: गुरूचे गोचर प्रेम आणि वैवाहिक जीवनात सकारात्मकता घेऊन येईल. जे लोक भागीदारीत (पार्टनरशिप) व्यवसाय करतात. त्यांनाही चांगला नफा मिळू शकतो.
मीन: गुरू तुमच्या राशीचे स्वामी आहेत; परंतु ३१ ऑक्टोबरपासून त्यामुळे तुम्ही थोडे सावध राहिले पाहिजे. कोर्ट-कचेरीच्या बाबींमध्येही दक्षता बाळगा. मात्र, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
