Daily Horoscope 6 November 2026 : उद्या ६ नोव्हेंबर २०२६ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असणार आहे. उद्या विष्कंम्भ योग आणि हस्त नक्षत्र जुळून येईल. उद्या अभिजात मुहूर्त ११ वाजून ५३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत असेल आणि राहू काळ १ वाजून ३३ मिनिटांनी सुरु होईल ते २ वाजून ५६ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज धनत्रयोदशी असणार आहे. तुमच्या नशिबात धनत्रयोदशीला काय असणार जाणून घेऊ.
आजचे पंचांग व राशिभविष्य, ६ नोव्हेंबर २०२६ (Horoscope Today 6 November 2026 in Marathi)
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा करा. कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये. नवीन गोष्टी आमलात आणाव्यात.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
उगाचच भांडणात पडू नका. घरात खबरदारी घेऊन काम करावे. मन शांत ठेवून कार्यरत राहावे. कार्यालयीन सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता. धैर्याने परिस्थिती हाताळावी.
दैनिक मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करा. आपली उपासना सफल होईल. आजचा दिवस चांगला जाईल. घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. वडीलधार्या मंडळींची काळजी घ्यावी. दिनक्रम व्यस्त राहील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. समोरच्या व्यक्तिमधील चुका काढत बसू नका.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
घरात शांततेचे वातावरण राहील. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. आवडत्या वस्तु खरेदी कराल. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
कष्टाच्या मानाने यश पदरी पडेल. स्पर्धेत यश मिळवाल. कामानिमित्त प्रवास घडेल. सर्वत्र आनंद शोधाल. अचानक खर्च उद्भवू शकतात.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
अनावश्यक खर्च कमी करा. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. मित्रांचे सहकार्य लाभू शकेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. अधिकारात वृद्धी होईल.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
केलेला संकल्प पूर्ण होईल. आपले विचार लोकांसमोर मांडाल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतील. एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. अनावश्यक खर्च उद्भवतील.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
आपला आत्मविश्वास कायम ठेवा. घरासंबंधीची कामे पूर्ण करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भौतिक गोष्टींचा अनुभव घ्याल. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
आपला संयम कमी येईल. अति साहस दाखवू नका. आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. छोटे प्रवास संभवतात. बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल. व्यवसाईकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. मनातील नवीन योजनांचा पाठपुरावा करावा.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
नवीन संधी चालून येऊ शकते. लहान प्रवास कराल. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता. पदोन्नतीचे योग संभवतात. घरात अतिथी जमतील.
