Dhanteras Horoscope: ग्रहांचा राजा सूर्य साधारण १४-१५ दिवसांनी नक्षत्र बदलतो. सध्या सूर्य स्वाती नक्षत्रात आहे. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सूर्य विशाखा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. याच दिवशी, म्हणजे शुक्रवारी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. विशाखा नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी गुरुच्या नक्षत्रात होणारे सूर्याचे गोचर महत्त्वाचे मानले जात आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुच्या नक्षत्रात सूर्याच्या प्रवेशामुळे पाच राशींच्या नशिबात मोठा बदल होऊ शकतो. सूर्य १९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत म्हणजे पुढील १४ दिवस विशाखा नक्षत्रात राहणार आहे.
पंडित नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, सूर्य जेव्हा एखाद्या राशीत किंवा नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा त्या राशीच्या किंवा नक्षत्राच्या स्वामी ग्रहाचा प्रभाव त्याच्यावर पडतो. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्य गुरुच्या नक्षत्रात प्रवेश करत असल्याने पुढील १४ दिवस त्याच्यावर गुरुचा प्रभाव राहील.
सूर्य हा आत्मविश्वास, वडील, धैर्य आणि पराक्रमाचा कारक मानला जातो, तर देवगुरु बृहस्पती हे धन, संपत्ती आणि वैभवाचे कारक आहेत. त्यामुळे गुरुच्या प्रभावामुळे काही राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती होईल आणि आर्थिक स्थितीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या, सूर्याच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या राशींचे नशीब उजळू शकते.
मिथुन रास: खर्चात होईल घट
सूर्याच्या या गोचर काळात शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगले यश मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. व्यावसायिकांना नवीन करार किंवा डील मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. उत्पन्न वाढेल आणि खर्च कमी झाल्याचा अनुभव येईल.
कर्क रास: उत्पन्न वाढण्याची शक्यता
कर्क राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होऊ शकतो. धनसंपत्तीत वाढ होण्याचे संकेत आहेत. नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. प्रभावशाली व्यक्तींशी ओळख वाढेल, ज्याचा फायदा करिअर आणि नोकरीत होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नोकरीतील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे.
सिंह रास: मेहनतीचे फळ मिळेल
सिंह राशीच्या लोकांचे धैर्य आणि पराक्रम वाढेल आणि त्याचा चांगला फायदा मिळेल. केलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो. व्यवसायात प्रगती होईल. नवीन लाभाच्या संधी मिळतील आणि त्याचा फायदा घेता येईल. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत.
धनु रास: करिअरमध्ये प्रगतीची शक्यता
धनु राशीच्या लोकांना नोकरीत बढती किंवा पदोन्नती मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो आणि तो फायदेशीर ठरेल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. धनसंपत्तीत वाढ होण्याचे संकेत आहेत.
मीन रास: अचानक धनलाभाचे योग
मीन राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. पितृसंपत्तीसंबंधी लाभ मिळू शकतो. गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी मिळतील. महत्त्वाचे निर्णय यशस्वीपणे घेता येतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांचे सहकार्य आणि आशीर्वाद मिळेल. तुमची काम करण्याची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्यातिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
