शास्त्रामध्ये वास्तूचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. असे मानले जाते की आपले घर किंवा कार्यालय वास्तुशास्त्राच्या अनुसार तयार करण्यात आले असेल, तर जीवनात सुख-समृद्धी येते. मात्र, असे न केल्यास जीवनात दारिद्र्य येते असेही म्हणतात. यंदा २४ ऑक्टोबरला दिवाळी साजरी केली जाणार आहे. दिवाळीच्या आधी घराची साफसफाईचा कार्यक्रम ठरलेला असतो.

वास्तुशास्त्रात घरातील अशा काही स्थानांचा उल्लेख केला आहे, ज्यांची स्वच्छता करताना चूक झाल्यास तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. असे मानले जाते या स्थानांवर देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे वास्तव्य असते. दिवाळीच्या आधी या स्थानांची साफसफाई करताना तुमच्या हातून कोणतीही चूक झाल्यास भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर देव तुमच्यावर नाराज होऊ शकतात. ही स्थाने कोणती आहेत ते आपण जाणून घेऊया.

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

घराचा ईशान्य कोपरा

वास्तुशास्त्रात घरातील ईशान्य दिशेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. उत्तर-पूर्व दिशेला ईशान्य दिशा मानली जाते. वास्तूशास्त्रात असे म्हटले आहे की ही दिशा देवी-देवतांची आहे. त्यामुळे ही दिशा सर्वांत पवित्र दिशा मानली जाते. घराच्या ईशान्य कोपर्‍यात देव्हारा ठेवला जातो. ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी, असे वास्तूशास्त्रात सांगितले आहे. तसेच येथे कोणतीही निरुपयोगी किंवा जड वस्तू ठेवण्यास मनाई केली जाते.

Shani Transit : २०२३ मध्ये वाढणार ‘या’ राशींची चिंता; करावा लागू शकतो शनिच्या साडेसातीचा सामना

अशीही मान्यता आहे की घराचा ईशान्य कोपरा अस्वच्छ ठेवल्यास वास्तुदोष होऊ शकतो. यामुळे देवी लक्ष्मी रागावू शकते. म्हणूनच दिवाळीपूर्वी ईशान्य दिशेची स्वच्छता करण्यास सांगितले जाते.

ब्रह्म स्थान

वास्तुशास्त्रात घराच्या मध्यभागाला ब्रह्मस्थान म्हटले जाते. त्याला सूर्यस्थान असेही म्हणतात. या ठिकाणालाही विशेष महत्त्व आहे. ही जागा नेहमी स्वच्छ ठेवावी असे म्हटले जाते. तसेच या ठिकाणी कोणतीही जड व तुटलेली वस्तू ठेवण्यास मनाई केली जाते. जर तुम्ही असे केले तर वास्तुदोषांमुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते. त्यामुळे दिवाळीपूर्वी ब्रह्म स्थानाची स्वच्छता करण्यास सांगितले जाते. यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)