Gajkesari Yog 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर राशी बदल करतो. पण, चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह आहे. तो एका राशीत सुमारे सहा दिवस राहतो. चंद्राच्या राशीमध्ये इतक्या झपाट्याने होणाऱ्या बदलाचा १२ राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव पडत असतो, कारण चंद्र काही राशींमध्ये कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग करत असतो; ज्याचे शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. त्याचप्रमाणे चंद्राने २० ऑक्टोबर वृषभ राशीत गुरु ग्रहाशी संयोग केला आहे त्यामुळे गजकेसरी नावाचा शक्तिशाली राजयोग तयार झाला आहे. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होऊन आर्थिक लाभ होऊ शकतो. चला जाणून घेऊया चंद्र आणि गुरुच्या संयोगाने तयार होणाऱ्या गजकेसरी योगामुळे कोणत्या राशींना भरपूर लाभ मिळू शकतो.

द्रीक पंचांगानुसार, १९ ऑक्टोबरला संध्याकाळी ४.१० वाजता चंद्राने वृषभ राशीत प्रवेश केला आणि २१ ऑक्टोबरला संध्याकाळी ६.१५ पर्यंत या राशीत राहील. यानंतर मिथुन राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत गजकेसरी योग तयार झाल्यामुळे या काळात काही राशींना नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मेष

गजकेसरी राजयोगाने मेष राशींच्या लोकांचे आयुष्य बदलू शकते. हा काळ मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. अनेकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होतील. नवीन नोकरी मिळण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. प्रमोशनसह बोनसदेखील मिळू शकतो. आर्थिक स्थिती चांगली असू शकते. आरोग्यही चांगले राहील.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठीही गजकेसरी योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक बदल दिसून येऊ शकतात. कामाचा ताण थोडा कमी होईल, यामुळे मानसिक तणावातून काही प्रमाणात आराम मिळू शकतो. व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. यासह तुम्हाला मोठी ऑर्डरही मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होऊ शकतात. या काळात तुम्ही भरपूर पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता. कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकता. जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात.

डिसेंबरनंतर ‘या’ राशींच्या लोकांची चांदी! शनी शुक्राच्या संयोगाने होणार पैशांचा पाऊस अन् नोकरीत घवघवीत यश

कन्या

गुरु आणि चंद्राच्या संयोगाने तयार झालेला गजकेसरी योग कन्या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. यासह करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होऊ शकतात. तुमच्या कामाचा विचार करून तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. यासह बोनस आणि इन्सेन्टिव्ह मिळण्याची शक्यता अधिक आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader