Diwali Lakshmi Yog 2026 : नोव्हेंबर महिना सुरू होताच ग्रहांची चाल काही राशींसाठी खूप खास असणार आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी चंद्र आणि मंगळ यांच्या युतीमुळे कर्क राशीत ‘लक्ष्मी योगा’ची निर्मिती होत आहे. ज्योतिष शास्त्रात या योगाला धन, समृद्धी आणि आर्थिक प्रगतीशी जोडले जाते. असा विश्वास आहे की, या शुभ योगाच्या प्रभावामुळे काही लोकांना अडकलेले जुने पैसे परत मिळू शकतात, तर काहींसाठी कमाईचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. नोकरदारांच्या उत्पन्नात वाढ आणि व्यावसायिकांना नफा मिळण्याचे संकेत आहेत. चला जाणून घेऊया, नोव्हेंबरमधील लक्ष्मी योगामुळे कोणत्या ३ राशींना विशेष फायदा होऊ शकतो.

कधी बनणार लक्ष्मी योग आणि त्याचे महत्त्व काय?

ज्योतिषशास्त्रानुसार, १ नोव्हेंबर २०२६ च्या संध्याकाळी चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल. मंगळ आधीपासूनच कर्क राशीत उपस्थित आहे. अशा स्थितीत या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे लक्ष्मी योग तयार होत असल्याचे म्हटले जात आहे.

ज्योतिष शास्त्रामध्ये चंद्राला मन, सुख-सुविधा आणि मानसिक स्थितीचा कारक मानले जाते, तर मंगळ हा ऊर्जा, धाडस, जमीन आणि पराक्रमाशी जोडलेला आहे. या दोन्ही ग्रहांचे मिलन आर्थिक निर्णय, मालमत्ता आणि कामकाजाशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक परिणाम देणारे मानले जाते. मात्र, याचा प्रभाव प्रत्येक राशीवर वेगवेगळा असू शकतो.

या ३ राशींसाठी शुभ ठरणार लक्ष्मी योग:

१. मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी योग आर्थिक बाबींमध्ये आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात, तर नोकरदारांच्या पगारात वाढीचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. जमीन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठीही काळ अनुकूल ठरू शकतो. या काळात तुमच्या बचतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

२. कर्क (Cancer)

    कर्क राशीतच लक्ष्मी योग तयार होत असल्याने, या राशीच्या लोकांसाठी याचे विशेष महत्त्व मानले जात आहे. तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होऊ शकतात. व्यवसायाचा विस्तार आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत आहेत. काही लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. मानसिक ताणतणाव कमी होईल. कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल पाहायला मिळतील. वैवाहिक जीवनात परस्पर ताळमेळ अधिक चांगला होण्याची शक्यता आहे.

    ३. कन्या (Virgo)

    कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग उत्पन्न आणि नफ्याशी संबंधित बाबींमध्ये अतिशय शुभ ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना वेतनवाढ किंवा अतिरिक्त कमाईची संधी मिळू शकते. व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत. गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्येही फायद्याची शक्यता वर्तवली जात आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि कुटुंबातील सुख-सुविधांवर पैसे खर्च करण्याच्या संधी मिळतील. बऱ्याच काळापासून ठरवलेली एखादी योजना पुढे नेण्यात यश मिळू शकेल.

    (टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)