Ravi Pushya Yog 2026 Shubha Muhurat : रविवारी ०१ नोव्हेंबर रोजी पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला असून, ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी आहे. म्हणजेच, दिवाळीपूर्वीच कोणतीही नवीन खरेदी किंवा नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा उत्तम योग आहे. पंचांगानुसार, जेव्हा रविवारी पुष्य नक्षत्राचा योग येतो, तेव्हा त्यास ‘रवि पुष्य नक्षत्र’ असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत शुभ मानला जातो.
ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राला अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. या नक्षत्रात सोन्या-चांदीचे दागिने, जमीन-दुकान, आणि चैनीच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ असते. खरेदी व्यतिरिक्त, व्यापारी या दिवशी नवीन वही-खाते सुरू करतात, तर सर्वसामान्य नागरिक लक्ष्मी-गणपतीची पूजा करतात.
रवि पुष्य नक्षत्राचे महत्त्व काय आहे?
रविवारी पुष्य नक्षत्र आल्यामुळे रवि पुष्य नक्षत्र योगाची निर्मिती होते. रविवार हा सूर्यदेवांना समर्पित असतो आणि ज्योतिषशास्त्रात सूर्य हा मान-सन्मान, प्रतिष्ठा, नेतृत्व आणि आत्मविश्वासाचा कारक मानला जातो. दुसरीकडे, पुष्य नक्षत्र हे स्थिरता, सुख, समृद्धी, लाभ आणि शुभतेचे प्रतीक आहे. यामुळे रवि पुष्य नक्षत्रात केलेले शुभ कार्य व्यक्तीच्या आयुष्यात मान-सन्मान, सुख, प्रसिद्धी आणि लाभ घेऊन येते.
ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्र
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एकूण २७ नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र हे सर्वात शुभ नक्षत्र मानले जाते. पुष्य नक्षत्र हे स्थिरता, लाभ, सुख-समृद्धी आणि चांगल्या भाग्याचे प्रतीक आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या नक्षत्रात खरेदी केलेल्या वस्तू माणसाच्या आयुष्यात दीर्घकाळ स्थिरता आणि शुभता टिकवून ठेवतात. याशिवाय, या नक्षत्रात पूजाअर्चा केल्याने सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात.
रवि पुष्य नक्षत्रात काय खरेदी करणे शुभ असते?
ज्योतिषशास्त्रानुसार, रवि-पुष्य योगात सोन्या-चांदीची नाणी, नवीन दागिने, भांडी आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.
रवि पुष्य नक्षत्रात नवीन कार, बाईक इत्यादी वाहनांची बुकिंग करू शकता किंवा डिलिव्हरी देखील घेऊ शकता. हे खूप शुभ मानले जाते.
रवि पुष्य योगात घर, जमीन, मालमत्ता (प्लॉट) इत्यादी गोष्टी खरेदी करता येतात.
या योगात देवाच्या मूर्ती आणि पूजेचे इतर साहित्य देखील खरेदी करू शकता.
रवि पुष्य नक्षत्रात पूजा आणि खरेदीचे शुभ मुहूर्त
चर (चल): सकाळी ७:३० ते सकाळी ९:०० वाजेपर्यंत
लाभ: सकाळी ९:०० ते सकाळी १०:३० वाजेपर्यंत
अमृत: सकाळी १०:३० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत
शुभ: दुपारी १:३० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत
शुभ: संध्याकाळी ६:०० ते ७:३० वाजेपर्यंत
अमृत: संध्याकाळी ७:३० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत
चर (चल): रात्री ९:०० ते १०:३० वाजेपर्यंत
