Diwali 2026 NeechBhang Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद, सौंदर्य आणि भौतिक सुखसोयींचा घटक मानले जाते. त्यामुळे, शुक्राच्या स्थितीचा या क्षेत्रांवर सर्वाधिक प्रभाव पडतो. सध्या, शुक्र तूळ राशीत भ्रमण करत आहे आणि ६ नोव्हेंबरच्या रात्री तो आपली राशी बदलून कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

विशेष म्हणजे, दिवाळीच्या दिवशी शुक्र ग्रहाचा त्याच्या नीच राशीत प्रवेश होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या ग्रहस्थितीचा संबंध नीचभंग योगाशी जोडला जात आहे. त्यामुळे हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारे करण्यात आले आहे. त्यामुळे शुक्राच्या या राशीबदलाचा कोणत्या राशींवर परिणाम होऊ शकतो आणि कोणत्या राशींसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो याबद्दल जाणून घेऊयात…

नीचभंग राजयोग कसा तयार होईल?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्राची उच्च राशी मीन आहे आणि त्याची सर्वात नीच राशी कन्या आहे. त्यामुळे, जेव्हा शुक्र कन्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याची स्थिती लक्षणीयरीत्या कमजोर होते. परिणामी, सर्व राशींवरील त्याचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी होतो. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार एखादा ग्रह नीच राशीत असताना त्या राशीचा स्वामी चंद्र लग्नापासून केंद्रस्थानी असेल, तर नीचभंग राजयोग तयार होतो, असे मानले जाते.

यंदा ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी आहे. या दिवशी शुक्र कन्या राशीत असेल, तर कन्या राशीचा स्वामी बुध तूळ राशीत स्थित असेल. विशेष म्हणजे, चंद्रदेखील याच दिवशी तूळ राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे बुध हा चंद्रापासून केंद्रस्थानी म्हणजेच पहिल्या घरात असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, या ग्रहस्थितीमुळे नीचभंग राजयोग तयार होत आहे. विशेष म्हणजे, या काळात शुक्र वक्री अवस्थेत असणार आहे.

वृषभ

शुक्र तुमच्याराशीचा स्वामी आहे. त्यामुळे तुमच्यासाठी नीचभंग राजयोग महत्त्वपूर्ण ठरू शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असू शकते. याव्यतिरिक्त, प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. नोकरदारांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही तुमची कार्यक्षमता सिद्ध करण्यात यशस्वी होऊ शकता. यामुळे वरिष्ठ अधिकारी प्रसन्न होऊ शकतात. हा काळ व्यावसायिकांसाठीही चांगला असू शकतो आणि तुम्ही नवीन संपर्क साधू शकता. प्रेम जीवनही चांगले राहील. याचबरोबर वैवाहिक जीवनातील समस्या सुटतील. पण, या काळात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सावधगिरीने करा.

सिंह

तुमच्यासाठी दिवाळीचा पहिला दिवस खूप चांगला असू शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत खुले होऊ शकतात. नोकरदारांना कठोर परिश्रमाचे आणि समर्पणाचे पूर्ण फळ मिळू शकते. व्यावसायिकांनाही नफा मिळण्याची शक्यता आहे. जीवनात आनंद येऊ शकतो. कुटुंबात शांतता आणि आनंद राहील, वैवाहिक जीवन चांगले राहील आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ सुद्धा घालवता येणार आहे.

धनु

शुक्राचे संक्रमण करिअर आणि व्यवसाय या दोन्हीमध्ये लाभ देऊ शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली पदोन्नती मिळू शकते. बोनस आणि वेतनवाढीचीही शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा चांगला काळ असू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि नवीन संपर्क साधण्यासाठी हा काळ चांगला असू शकतो. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल एक मोठा निर्णय घेऊ शकता आणि तुमच्या कामाचे कौतुक सुद्धा होऊ शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)