Diwali Horoscope: नोव्हेंबरचा नवीन आठवडा धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. या आठवड्यात हिंदू धर्मातील प्रमुख सण धनत्रयोदशी (धनतेरस) आणि दिवाळी साजरी केली जाणार आहे. दिवाळी हा सण सुख, समृद्धी, प्रकाश आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो.
दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान गणेश आणि कुबेर देव यांची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळीपासून सुरू होणारा हा आठवडा काही राशींसाठी भरपूर आनंद, आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये मोठे यश घेऊन येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, दिवाळीचा हा आठवडा कोणत्या राशींसाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे.
मेष राशी (Aries Horoscope)
या आठवड्यात मेष राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहील. या राशीतील व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. पैशांशी संबंधित अडचणी दूर होतील आणि घरात आनंदाचे वातावरण राहील.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठीही दिवाळीचा हा आठवडा फायदेशीर ठरणार आहे. रखडलेली सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांच्या कृपेने धनलाभाचे चांगले योग आहेत. तसेच, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतील.
कन्या राशी (Virgo Horoscope)
नोव्हेंबरचा नवीन आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी संधींनी भरलेला असेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो. व्यवसायात मोठा करार निश्चित होण्याची शक्यता असून त्यातून भरघोस नफा मिळेल. या आठवड्यात घरात धन, समृद्धी आणि आनंदाचे आगमन होईल.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
या आठवड्यात तुमची सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत बढती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना यश मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा आठवडा तुमच्यासाठी शुभ ठरेल.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील. शेअर बाजारातून अचानक मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. माता लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. तसेच, बढतीची आनंदाची बातमीही मिळू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्यातिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
