Diwali Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार, नोव्हेंबर महिन्यात ग्रहांची स्थिती काही राशींसाठी खूप खास ठरणार आहे. पंचांगानुसार, ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी शुक्र ग्रह तूळ राशीत प्रवेश करून मालव्य महापुरुष राजयोग तयार करणार आहे.

ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला धन, ऐश्वर्य, सुख-सुविधा, प्रेम आणि वैभवाचा कारक मानले जाते. तूळ ही शुक्राची स्वतःची रास असल्यामुळे या राशीत शुक्राचे आगमन मालव्य राजयोग अधिक प्रभावी ठरू शकते. या शुभ योगाच्या प्रभावामुळे काही राशींच्या लोकांना आर्थिक प्रगती, करिअरमध्ये यश आणि सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

फ्युचर पंचांगानुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे ६ नोव्हेंबर रोजी रात्री १ वाजून ४ मिनिटांपर्यंत शुक्र ग्रह तूळ राशीत राहून मालव्य राजयोग तयार करेल. त्यानंतर तो कन्या राशीत वक्री होईल. तसेच २२ नोव्हेंबरला शुक्र पुन्हा तूळ राशीत प्रवेश करेल.

मेष राशी (Aries Zodiac)

मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे गोचर सुख-सुविधांमध्ये वाढ करणारे ठरू शकते. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल आणि जोडीदाराची साथ मिळेल. भागीदारीच्या व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल आणि नवीन योजनांवर काम सुरू करू शकता.

तूळ राशी (Libra Zodiac)

तूळ राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग फायदेशीर ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कन्या राशी (Virgo Zodiac)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा राजयोग आर्थिक बाबतीत शुभ परिणाम देऊ शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. तसेच गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्येही सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

मकर राशी (Capricorn Zodiac)

मकर राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग करिअर आणि आर्थिक बाबतीत शुभ ठरू शकतो. नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते. व्यवसाय वाढवण्याचा विचार यशस्वी होऊ शकतो. उत्पन्नात वाढ होईल आणि भौतिक सुख-सुविधांवर खर्च करण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्यातिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)