Dhanteras Horoscope: हिंदू धर्मात धनत्रयोदशीचा सण सुख, समृद्धी, धन आणि उत्तम आरोग्याचे प्रतीक मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते.

२०२६ मध्ये धनत्रयोदशीचा सण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही विशेष मानला जात आहे. यावेळी सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या लोकांना बुद्धिमत्ता, मान-सन्मान, करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत लाभ मिळू शकतो. हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारावर करण्यात आले आहे. जाणून घ्या, बुधादित्य राजयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.

वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधादित्य राजयोग हा महत्त्वाचा राजयोग मानला जातो. द्रिक पंचांगानुसार, सध्या बुध आणि सूर्य हे दोन्ही ग्रह तूळ राशीत भ्रमण करत आहेत. बुधाने २ सप्टेंबरला, तर सूर्याने १७ ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश केला होता. त्यामुळे ६ नोव्हेंबरला या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे.

धनत्रयोदशीला बुधादित्य राजयोग विशेष का मानला जातो?

ज्योतिषीय गणनेनुसार, ६ नोव्हेंबरला सूर्य आणि बुध यांची तुळ राशीत युती होत आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी तयार होणारा हा राजयोग धन, व्यवसाय, बुद्धिमत्ता आणि आर्थिक नियोजनासाठी लाभदायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांसोबतच व्यावसायिक आणि गुंतवणूक करणाऱ्यांनाही याचा फायदा होऊ शकतो. मात्र, बुधादित्य राजयोगाचा प्रभाव सर्व राशींवर सारखा होत नाही. व्यक्तीची कुंडली, लग्न, चंद्र रास आणि ग्रहांची स्थिती यानुसार त्याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात.

मिथुन राशीवर बुधादित्य राजयोगाचा प्रभाव (Gemini Zodiac)

मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध आणि सूर्याच्या युतीमुळे तयार होणारा बुधादित्य राजयोग लाभदायक ठरू शकतो. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते. व्यवसायात नवीन योजना आखत असाल, तर त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळू शकतात. कुटुंबात सुख-शांती राहील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर त्यात यश मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना असेल, तर त्यातूनही फायदा होऊ शकतो.

सिंह राशीवर बुधादित्य राजयोगाचा प्रभाव (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. बुधादित्य राजयोगामुळे शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे. मान-सन्मान वाढू शकतो. करिअरमध्येही चांगल्या संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार किंवा आर्थिक फायदा मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे.

कुंभ राशीवर बुधादित्य राजयोगाचा प्रभाव (Aquarius Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग प्रगतीची नवीन दारे उघडू शकतो. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, त्यामुळे महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये यश मिळू शकते. व्यवसायात नवीन ओळखी तयार होतील आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होऊ शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्यातिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)