Neechbhang Rajyog: ज्योतिषशास्त्रात नीच भंग राजयोगाबद्दल असे म्हटले जाते की, जेव्हा कुंडलीतील एखादा नीच ग्रह नीच फळ देत नाही आणि कमजोर फळ देण्याऐवजी शक्तिशाली राजयोग तयार करतो, तेव्हा त्याला नीचभंग म्हणजेच नीचत्व भंग होणारा राजयोग असे म्हणतात. यानंतर तोच ग्रह चांगले फळ देतो. मात्र काही विशेष ग्रहांमध्येही नीचभंगाची स्थिती मानली जाते.

तूळ राशीत सूर्य नीच राशीचा मानला जातो. मात्र येथे त्याचा नीचत्व भंग होतो. त्यामुळे तो शुभ फळ देतो. म्हणून सूर्याचे तूळ राशीत जाणे म्हणजे नीचभंग राजयोग तयार होणे असे मानले जाते.

यावर्षी १७ ऑक्टोबर रोजी सूर्य कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करेल. दिवाळीपूर्वी तयार होणारा हा राजयोग अनेक राशींसाठी धनलाभ घेऊन येणार आहे. हे तुम्ही सामान्य राशीभविष्य म्हणून समजू शकता. मात्र प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याच्या तूळ राशीतील प्रवेशामुळे नीचभंग राजयोग तयार होईलच असे नाही. त्यासाठी कुंडलीनुसार गोष्टी समजून घ्याव्या लागतील.

आता हा योग तयार झाल्यामुळे अनेक राशींसाठी परिस्थिती बदलणार आहे. अनेक राशींमध्ये बदल पाहायला मिळतील. अशावेळी या योगाचा कोणत्या राशींवर काय परिणाम होईल, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी हा योग खूप खास ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या या राशीसाठी चांगले संकेत मिळत आहेत. ऑफिसमध्ये प्रमोशन आणि नवीन पद मिळू शकते. जे लोक व्यवसाय करत आहेत, त्यांच्यासाठीही चांगल्या संधी येऊ शकतात. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतले, तर फायदा होऊ शकतो.

सिंह राशी (Leo Horoscope)

या योगामुळे सिंह राशीच्या लोकांसाठीही शुभ लाभाचे संकेत मिळत आहेत. तुम्हाला गेल्या काही काळापासून जे नुकसान सहन करावे लागत होते, ते आता फायद्यात बदलू शकते. हा योग तुम्हाला आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील, त्यामुळे कमाईवर परिणाम होईल. त्यानंतर उरलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवा. यामुळे भविष्यात प्रगती करण्यास मदत होईल.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

या राशीसाठीही चांगले संकेत मिळत आहेत. व्यवसायातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमची जी कामे काही काळापासून अपूर्ण होती, ती पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला नवीन ऑर्डर मिळू शकतात. यामुळे पुढे तुमच्या क्षमतेचा चांगला परिणाम पाहायला मिळू शकतो. तुमची काबिलियत दाखवण्यासाठी ही चांगली संधी आहे. ती हातातून जाऊ देऊ नका.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)