Dhanteras Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक ग्रह ठराविक कालावधीनंतर फक्त राशीच नाही तर नक्षत्रही बदलतात. या बदलाचा परिणाम सर्व १२ राशींवर कमी-अधिक प्रमाणात होत असतो. सुख, ऐश्वर्य आणि संपत्तीचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह ६ नोव्हेंबर २०२६ रोजी राशी परिवर्तन करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, याच दिवशी धनत्रयोदशीचाही शुभ योग जुळून येत आहे, जो अत्यंत शुभ मानला जातो.
शुक्राचे कन्या राशीत होणारे गोचर सौंदर्य, प्रेम, ऐश्वर्य, सुख-सुविधा आणि आर्थिक समृद्धीचे संकेत देणारे आहे. या बदलामुळे काही राशींच्या आयुष्यात आनंद, यश आणि प्रगतीची नवी दारे उघडू शकतात. उज्जैनचे आचार्य आनंद भारद्वाज यांच्या मते, या गोचराचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे, ते जाणून घेऊया.
‘या’ ४ राशींना होणार फायदा
वृषभ राशी (Taurus Horoscope)
शुक्राचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. धार्मिक कार्यांमध्ये रस वाढेल. जोडीदारासोबत तीर्थयात्रेला जाण्याचा योग येऊ शकतो. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित समस्या कमी होतील. संततीसुखाची वाट पाहणाऱ्या दाम्पत्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. तसेच प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे.
सिंह राशी (Leo Horoscope)
शुक्राचे राशी परिवर्तन सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीसह पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन व्यवहार आणि चांगला नफा मिळू शकतो. नशिबाची साथ मिळाल्याने रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल, बचत वाढेल आणि करिअरमध्ये पुढे जाण्याच्या नव्या संधी मिळतील.
कन्या राशी (Virgo Horoscope)
शुक्राचे गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. नशिबाची चांगली साथ मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील, त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. पैशांशी संबंधित अडचणी दूर होतील. कुटुंबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. वैवाहिक जीवनात प्रेम, गोडवा आणि परस्परांतील समजूतदारपणा वाढेल.
मीन राशी (Pisces Horoscope)
शुक्राचे हे राशी परिवर्तन मीन राशीच्या लोकांसाठी आनंददायी ठरू शकते. घरातील वाद किंवा जुने मतभेद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. नातेसंबंध अधिक घट्ट होतील आणि समाजात मान-सन्मान वाढेल. मुलाखत किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. प्रत्येक कामात यश मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्यातिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
