Mangal Gochar: १८ सप्टेंबरपासून मंगळ ग्रह कर्क राशीत गोचर करत आहे. आता मंगळ आणखी १० दिवस याच राशीत राहणार आहे. या १० दिवसांत मंगळाचा ४ राशींना विशेष लाभ होणार आहे. १२ नोव्हेंबरपर्यंत मंगळाच्या या गोचराचा मेष, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांना फायदा होईल.
मंगळ कर्क राशीत आल्यावर घर-परिवारातील वातावरण अधिक मजबूत होते. तसेच मालमत्ता आणि कामाशी संबंधित बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते. या काळात व्यक्ती भावनिकदृष्ट्याही अधिक मजबूत वाटते. जाणून घेऊया, या लाभदायक राशींच्या आयुष्यात कोणते बदल होऊ शकतात.
मंगळ गोचराचा लाभ कोणत्या राशींना होणार?
मेष राशीवर मंगळ गोचराचा काय परिणाम होईल?
मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे गोचर खूप खास ठरणार आहे. या काळात नोकरीत चांगली प्रगती होऊ शकते. नवीन जबाबदारी मिळाल्याने आनंद होईल. कामामुळे ओळख वाढेल आणि करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. तसेच घर, जमीन किंवा वाहन खरेदीशी संबंधित काम पूर्ण होऊ शकते. मात्र, घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा.
वृश्चिक राशीवर मंगळ गोचराचा काय परिणाम होईल?
वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्यामुळे या राशीच्या लोकांनाही पुढील १० दिवस चांगले बदल अनुभवायला मिळू शकतात. प्रवासाचा योग येऊ शकतो. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला राहील. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. मात्र, पैशांशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घेणे अधिक योग्य ठरेल.
धनु राशीवर मंगळ गोचराचा काय परिणाम होईल?
मंगळ गोचरामुळे पुढील १० दिवस धनु राशीच्या लोकांना करिअरमध्ये लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामातून कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. मात्र, खर्च आणि बचत यामध्ये योग्य समतोल राखा. पैशांबाबत घाईने निर्णय घेऊ नका.
मीन राशीवर मंगळ गोचराचा काय परिणाम होईल?
मीन राशीच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर लाभदायक ठरेल. मुलांशी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांनाही चांगला नफा मिळू शकतो. नवीन प्रोजेक्ट सुरू झाल्याने मन आनंदी राहील. आर्थिक बाबतीत दिलासा मिळाल्याने समाधान वाटेल. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्यातिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
