Zodiac predictions in Marathi : आज २ नोव्हेंबर २०२४ रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी रात्री ८ वाजून २२ मिनिटांपर्यंत राहील. तसेच ११ वाजून १८ मिनिटांपर्यंत आयुष्मान योग जुळून येईल आणि रात्रीपर्यंत विशाखा नक्षत्र जागृत असणार आहे. तसेच आज बलिप्रतिपदाही साजरी केली जाणार आहे.

बलिप्रतिपदा हा दिवस ‘दिवाळी पाडवा’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सुवासिनी पतीला औक्षण करतात. तसेच व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ असे या दिवसाचे खास महत्त्व आहे. या दिवाळी पाडव्याला पतीला ओवाळण्यासाठी संध्याकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे.तर आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी कसा असेल हे आपण जाणून घेऊया…

diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य
Rashi Bhavishya On 31st October 2024
३१ ऑक्टोबर पंचांग: दिवाळीच्या पहिल्या दिवशी कोणाचं नशीब सोन्यासारखं चमकणार? व्यावसायिक क्षेत्रात प्रगती ते अचानक धनलाभ होणार; वाचा १२ राशींचे भविष्य

२ नोव्हेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- भागीदारीतील व्यावसाईकांना फायदा होईल. वैवाहिक समस्या दूर होतील. मुलांसोबत वेळ आनंदात घालवाल. सामाजिक मान सन्मान वाढेल. व्यापार्‍यांना लाभ संभवतो.

वृषभ:- किरकोळ इजा संभवते. घरातील लोकांची मने जिंकू शकाल. नवविवाहिताना चांगला दिवस जाईल. कुटुंबासमवेत वेळ मजेत घालवाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

मिथुन:- आजचा दिवस संमिश्र जाईल. मुलांची काळजी घ्यावी. काही खर्च आवाक्याबाहेर जाऊ शकतात. प्रेमिकांसाठी सौख्यकारक दिवस. मनमोकळ्या गप्पा मारता येतील.

कर्क:- कौटुंबिक सौख्य लाभेल. ग्रहमानाची उत्तम साथ लाभेल. तुमच्या तक्रारी दूर केल्या जातील. थोरांचे मार्गदर्शन मिळेल. आवडीची भेट वस्तु मिळेल.

सिंह:- आजचा दिवस उत्साही असेल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. मित्रांसोबत पार्टीचे बेत आखाल. भावंडांशी मनमोकळ्या गप्पा होतील. आतताईपणे वागू नये.

कन्या:- सामाजिक स्तरावर चांगले परिणाम दिसतील. बोलण्याने लोकांना आकर्षित करू शकाल. व्यवसायात घरातील लोकांचे सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होतील. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.

तूळ:- मानसिक चंचलतेला आवर घाला. जोडीदारासोबत खरेदीला जाल. जुने मित्र भेटतील. दिवस मजेत घालवाल. घरगुती कामात उत्साहाने हातभार लावाल.

वृश्चिक:- मानसिक चंचलता जाणवेल. जुनी गुंतवणूक उपयोगास येईल. महत्त्वाची खरेदी शक्यतो टाळावी. वेळेचा सदुपयोग करावा. दूरदृष्टीकोण बाळगावा.

धनू:- विविध स्तरातून लाभ होईल. थोरांकडून कौतुकास पात्र व्हाल. मौल्यवान भेटवस्तू मिळेल. वडील भावंडांची भेट होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

मकर:- दिवस घरात शांततेत जाईल. व्यावसायिक लोक दिवसभर व्यस्त राहतील. जवळचे नातेवाईकांचे आगमन होईल. दिवस आनंदात जाईल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.

कुंभ:- आजचा दिवस उत्तम जाईल. व्यावसायिक लोक नवीन काम हाती घेऊ शकतात. तज्ज्ञ लोकांचा सल्ला मिळेल. विद्यार्थ्यानी महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नयेत.वडीलधार्‍यांशी मतभेद टाळा.

मीन:- मन काहीसे अस्थिर राहील. अचानक धनलाभाची शक्यता. खाण्या-पिण्याची काळजी घ्यावी. मोहाला बळी पडू नका. मनातील साशंकता दूर करा.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )

Story img Loader