नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा म्हणजेच दिवाळीचा हा काळ १२ राशींच्या आयुष्यात आनंद आणि सुख घेऊन आला आहे. या आठवड्यात नवीन नोकरीच्या संधी, व्यवसायात भरभराट, कार्यक्षेत्रात बदल, मजबूत आर्थिक स्थिती आणि उत्तम आरोग्य लाभू शकेल. या ७ दिवसांत ग्रहांच्या स्थितीतही मोठे बदल होणार आहेत. या आठवड्यात सूर्य, बुध आणि शुक्र तूळ राशीत विराजमान असतील, तर ६ नोव्हेंबर रोजी शुक्र या राशीतून वक्री अवस्थेत कन्या राशीत प्रवेश करेल. याशिवाय, कर्क राशीत मंगळ, सिंह राशीत गुरु आणि केतू, मीन राशीत वक्री शनी, तर कुंभ राशीत राहू संचार करेल. तसेच, चंद्र २ ते 8 नोव्हेंबर दरम्यान कर्क, सिंह, कन्या आणि तूळ राशीत भ्रमण करणार असून विविध ग्रहांशी युती करेल.

पंडित के.पी. शुक्ल यांच्या मते, या आठवड्यात धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी ते थेट दिवाळीचा सण साजरा केला जात असल्याने काही राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे. जाणून घेऊया मेष ते मीन सर्व १२ राशींचे साप्ताहिक भविष्य…

१. मेष साप्ताहिक राशीभविष्य(Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यश आणि प्रगतीचा असणार आहे. या आठवड्यात नोकरी, व्यवसाय आणि करिअरमध्ये शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या उत्पन्नात वेगाने वाढ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अत्यंत चांगला असून, मान-सन्मानामध्ये वाढ होईल आणि तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. व्यवसायात नवीन ग्राहक जोडले जातील आणि जुन्या ग्राहकांकडूनही चांगला नफा होईल. मात्र, या काळात खर्च वाढू शकतात.

२. वृषभ साप्ताहिक राशीभविष्य(Taurus Weekly Horoscope)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनेक गोष्टींमध्ये खास ठरू शकतो. कुटुंबासोबत एखाद्या शुभ किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आहे. या आठवड्यात तुम्ही नवीन मित्र बनवाल आणि त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरी करणाऱ्यांच्या पदोन्नतीसोबतच इन्क्रीमेंटचे योग बनत आहेत. व्यापारामध्ये मोठा नफा होण्याची शक्यता आहे. जर नवीन काम सुरू करायचे असेल, तर हा काळ उत्तम ठरेल. मात्र, दूरच्या एखाद्या नात्यातील व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे बोलताना काळजी घ्या.

३. मिथुन साप्ताहिक राशीभविष्य(Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने खूपच चांगला राहील. व्यवसायात काहीतरी नवीन केल्यास फायदा होईल. तुम्ही आखलेली रणनीती तुम्हाला मोठा नफा मिळवून देऊ शकते. करिअरमध्येही प्रगती होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या गंभीर विषयावर चर्चा होऊ शकते, त्यामुळे घरातील लोकांचा तुमच्यावरील विश्वास अधिक दृढ राहील असा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.

४. कर्क साप्ताहिक राशीभविष्य(Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगती घेऊन आला आहे. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचे या आठवड्यात कौतुक होईल. तसेच, तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी मिळण्यासोबतच बोनस आणि प्रमोशनचे योगही जुळून येत आहेत. या आठवड्यात विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. याशिवाय, जमीन, भवन किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगलाच फायदा मिळण्याची शक्यता आहे.

५. सिंह साप्ताहिक राशीभविष्य(Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अत्यंत फायदेशीर ठरेल. तथापि, विनाकारण वाटणाऱ्या चिंतेमुळे तुम्ही थोडे त्रस्त होऊ शकता. नोकरीत प्रगती मिळण्यासोबतच प्रतिष्ठाही प्राप्त होईल. प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा उत्तम जाईल. आरोग्याकडे थोडे लक्ष ठेवा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

६. कन्या साप्ताहिक राशीभविष्य(Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यात यश आणि आर्थिक लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांचे वेतन वाढण्याचे योग आहेत. व्यापाऱ्यांसाठीही हा आठवडा अतिशय लाभदायक ठरू शकतो; नवीन ऑर्डर्स मिळतील आणि भविष्यात मोठा नफा होईल. जमीन किंवा वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबाची साथ मिळेल. तथापि, मनातील अनावश्यक चिंतेमुळे तुम्ही थोडे त्रस्त राहू शकता, त्यामुळे आरोग्याची पूर्ण काळजी घ्या.

७. तूळ साप्ताहिक राशीभविष्य(Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा करिअरच्या क्षेत्रात उत्तम लाभ मिळवून देणारा ठरेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे आता यशस्वीरीत्या पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उघडू लागल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. काम किंवा व्यापाराच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो, ज्याचा उद्देश साध्य होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळाल्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकाल. मात्र, मित्र किंवा जवळच्या व्यक्तींसोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा.

८. वृश्चिक साप्ताहिक राशीभविष्य(Scorpio Weekly Horoscope)

या आठवड्यात वृश्चिक राशीच्या जातकांना लाभ, प्रगती आणि पदोन्नतीचे योग दिसत आहेत. नोकरी करणाऱ्यांना इन्क्रीमेंट आणि प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. कोणाला दिलेले जुने पैसे परत मिळू शकतात. व्यापारामध्येही नफ्याचे योग आहेत. आयुष्यात बऱ्याच काळापासून चाललेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. तथापि, प्रकृतीची काळजी घ्या आणि आरोग्याबाबत सतर्क राहा.

९. धनु साप्ताहिक राशीभविष्य(Sagittarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. या आठवड्यात तुमचे रखडलेले जुने प्रकल्प पूर्ण होऊ शकतात. व्यवसायासाठी तुम्ही जे धोरण आखले आहे, ते अतिशय कारगर ठरेल. नवीन मित्र बनण्याचे योग आहेत. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. याशिवाय, अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती अत्यंत उत्तम राहील.

१०. मकर साप्ताहिक राशीभविष्य(Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या जातकांसाठी हा आठवडा आर्थिक दृष्टीने खूप लाभदायक ठरेल. संपत्ती आणि व्यवसायाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या आता सुटतील आणि प्रगतीचे नवे मार्ग उघडतील. मात्र, कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होण्याची शक्यता आहे. याशिवाय, या आठवड्यात शक्यतो लांबचा प्रवास टाळा.

११. कुंभ साप्ताहिक राशीभविष्य(Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा आनंदाची बरसात करणारा ठरेल. कुटुंबासोबत तुम्ही एखाद्या प्रवासाला जाऊ शकता. या आठवड्यात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील आणि उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. नोकरी करणाऱ्या जातकांनी जर एखाद्या मोठ्या प्रकल्पावर आधीपासून काम केले असेल, तर त्यात मोठे यश मिळू शकते; ज्यामुळे वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यापाऱ्यांसाठीही हा काळ उत्तम आहे. मात्र, मनात विनाकारण चिंता आणि तणाव राहू शकतो, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा.

१२. मीन साप्ताहिक राशीभविष्य(Pisces Weekly Horoscope)

मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा घसघशीत आर्थिक लाभ घेऊन येणार आहे. नोकरी आणि व्यवसायात शुभ लाभाचे योग आहेत. कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळू शकते. तथापि, एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका. धन-संपत्तीच्या वादापासून दूर राहा आणि थोडे सतर्क राहा.

(टीप: या लेखात दिलेली माहिती ज्योतिषीय गणना आणि सामान्य गृहितकांवर आधारित आहे. कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.)