Diwali Week Horoscope 2026 : दिवाळी ८ नोव्हेंबर पासून सर्वत्र साजरी होणार आहे. हा वर्षातील सर्वात विशेष सण मानला जातो, जो जीवनात आनंद, शुभ परिणाम आणि सकारात्मक बदल आणि नवीन सुरुवात घेऊन येतो. दिव्यांचा हा सण कार्तिक महिन्यात साजरा केला जातो. याची सुरुवात धनत्रयोदशीने होऊन भाऊबीजने शेवट होईल. यावर्षी, संपूर्ण दिवाळीचा आठवडा खूप विशेष असणार आहे. कारण – या काळात अनेक शुभ ग्रहयोग जुळून येणार आहेत.

मालव्य, विषकुंभ आणि त्रिग्रही योगांबरोबर, बुधादित्य आणि शुक्रादित्य योगांचा संयोगही जुळून येईल आणि या योगांचा सर्व राशींवर विशेष प्रभाव पडताना दिसणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींना या काळात आर्थिक लाभ, करिअरमध्ये यश आणि सन्मान मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया की धनत्रयोदशी ते भाऊबीजपर्यंतचा हा आठवडा कोणत्या राशींसाठी खूप शुभ असेल.

मेष

तुमच्यासाठी हा काळ यश आणि आनंद घेऊन येऊ शकतो. या काळात तुम्हाला सर्व क्षेत्रांमध्ये चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन लोकांना भेटाल आणि आयुष्यात काहीतरी मोठे करण्याचा निर्णय घ्याल. तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल.

कर्क

तुम्हाला नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. तुम्हाला आर्थिक बाबतीतही दिलासा मिळेल आणि पैशाशी संबंधित समस्या सुटू शकतात. या काळात कुटुंबात तुमचा आदरही वाढेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग खुले होतील. तुम्हाला कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधीही मिळेल.

सिंह

तुमच्यासाठी हा काळ अनुकूल असणार आहे. जे घरापासून दूर राहतात त्यांना कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्हाला करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. नवीन योजना किंवा व्यवसायाची संधी भविष्यात फायदा मिळवून देऊ शकते. तुमची स्वप्ने साकार होऊ शकतात आणि तुम्ही नवीन ध्येये निश्चित कराल.

तूळ

तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. या काळात नशीब तुमच्या बाजूने राहील आणि तुमच्या व्यवसायातही प्रगती होईल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक जीवनात स्नेह आणि परस्पर विश्वास वाढेल. कुटुंबात सुख नांदेल आणि तुम्ही कला क्षेत्रात प्रगती कराल. तुमच्या कारकिर्दीला चांगली दिशा देण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)