रात्री झोपेत स्वप्ने पडणे अगदी सामान्य आहे. अनेक वेळा आपण स्वप्नात असे काही पाहतो, ज्यानंतर आपण घाबरून जागे होतो. कधीकधी असे घडते की स्वप्नात आपण स्वतःला उंच जागेवरून पडताना पाहतो. अशा विचित्र स्वप्नांचे रहस्य स्वप्न शास्त्रात दडलेले आहे. स्वप्नात उंचावरून पडणे म्हणजे काय हे आपण आज जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक वेळा स्वप्नात आपण स्वतःला आकाशातून पडताना पाहतो. स्वप्न शास्त्रानुसार असे स्वप्न पाहणे अशुभ मानले जाते. असे स्वप्न पाहणे हे भविष्यात काही संकटे येण्याचे प्रतीक मानले जाते. अशा परिस्थितीत, आपण सावध आणि संयमी असणे आवश्यक आहे.

जर तुम्ही स्वप्नात स्वतःला घोड्यावरून पडताना पाहिले, तर हे तुमच्या आयुष्यात लवकरच आर्थिक समस्या येण्याचे चिन्ह आहे. स्वप्न शास्त्रानुसार, या प्रकारचे स्वप्न पाहणे हे एखाद्या प्रकारच्या शारीरिक दुखापतीचे प्रतीक देखील असू शकते.

सकाळी उठल्यावर ‘या’ गोष्टी पाहणे असते शुभ; होऊ शकतो धनलाभ

अनेक वेळा तुम्ही एखाद्या उंच इमारतीवरून किंवा डोंगरावरून खाली पडल्याचे स्वप्न पाहता. स्वप्न शास्त्रानुसार, या स्वप्नाचा अर्थ असा होतो की भविष्यात तुमचे उत्पन्न कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

रात्री झोपताना अनेकवेळा आपण स्वतःला अज्ञात ठिकाणाहून खाली पडताना पाहतो. असे स्वप्न पाहण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल त्रस्त आहात आणि लवकरच तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. स्वप्न शास्त्रानुसार, असे स्वप्न पाहणे तुम्हाला येणाऱ्या काळाबद्दल चेतावणी देते, ज्यामुळे तुम्हाला भविष्याची जाणीव होते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you also dream of falling from a height find out what this means pvp
First published on: 03-06-2022 at 16:42 IST