scorecardresearch

Vastu Tips : किचनमध्ये चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू; अन्यथा मोठ्या आर्थिक संकटाचा करावा लागेल सामना

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात काही वस्तू ठेवू नयेत, यामुळे घरातील समस्या वाढू शकतात.

kitchen pexels
काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरू लागते. (Photo L Pexels)

स्वयंपाकघर हे प्रत्येक घरातील महत्त्वाचे स्थान आहे. या खोलीत लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवीचा वास असतो अशी मान्यता आहे. म्हणूनच, स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे असे म्हणतात. परंतु काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरू लागते. याचा परिणाम कुटुंबातील सर्व सदस्यांवर होतो. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात काही वस्तू ठेवू नयेत, यामुळे घरातील समस्या वाढू शकतात. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत हे जाणून घेऊया.

आरसा

घर अधिक आकर्षक दिसावे म्हणून काहीजण स्वयंपाकघरातही आरसा लावतात. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरसा नसावा. स्वयंपाकघरातील शेगडी ही अग्निदेवाची निदर्शक असते, जर आरशात आगीचे प्रतिबिंब दिसले तर हे घरासाठी अशुभ ठरू शकते. यामुळे आपापसात वाद होतात. तसेच घराची आर्थिक स्थितीही ढासळू लागते.

Vastu Tips : बेडरूममध्ये चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू; मानसिक तणावासोबतच होईल आर्थिक नुकसान

मळलेले कणिक

बहुतेकदा, महिला चपात्या बनवल्यानंतर उरलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवून देतात आणि सकाळी पुन्हा याचा वापर करतात. वास्तूनुसार हे योग्य नाही. स्वयंपाकघरात मळलेले कणिक ठेवल्याने शनी आणि राहू यांचा नकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे अनेक प्रकारच्या समस्या येतात.

औषधे

स्वयंपाकघरात काम करत असताना जखम होणे सामान्य आहे. त्यामुळेच गरजेला उपयोगी पडतील म्हणून स्वयंपाक घरात औषधे, बँडेज इत्यादी साहित्य ठेवले जाते. परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात कोणत्याही प्रकारची औषधे ठेवू नये. कारण याचा आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. सोबतच अनावश्यक खर्च वाढू लागतो.

रस्त्यावर पैसे सापडल्यास आवर्जून करा ‘ही’ गोष्ट; बदलेल तुमचे नशीब

तुटलेली भांडी

स्वयंपाकघरात अनेक भांड्यांचा वापर केला जातो. काही भांडी दीर्घकाळ वापल्यामुळे तुटतात, तर कधी कधी काही प्रमाणात तुटलेली भांडीही वापरली जातात. परंतु ही चांगली गोष्ट नाही. स्वयंपाकघरात तुटलेली भांडी वापरल्याने घरातील सदस्यांमधील मतभेद वाढू लागतो.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dont keep these things in the kitchen you will face a big financial crisis pvp

ताज्या बातम्या