Vastu Tips: वेद आणि शास्त्रानुसार तुळशीमध्ये देवाचा वास असतो. या कारणास्तव, प्रत्येक घरात तुळशीचे रोप लावले जाते, जेणेकरून घरात नेहमी सुख आणि शांती राहावी. तुळशीच्या रोपाची नियमित पूजा करावी हे आपल्या पूर्वजांपासून सांगण्यात आलंय. त्यामुळे तुळशीची पूजा नित्यनेमाने केली जाते. वास्तुशास्त्रानुसार रोज सूर्योदयापूर्वी जल अर्पण करणे आणि संध्याकाळी तुळशीखाली तुपाचा दिवा लावल्याने सर्व त्रास दूर होतात. यासोबतच घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि घरात राहणाऱ्या प्रत्येक सदस्याची दिवसातून दुप्पट प्रगती होते. त्यामुळे तुळशीची पूजा करणं नेहमी शभ मानल जातं. त्याचबरोबर वास्तुशास्त्रात तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याबाबत काही नियम आहेत. या नियमनुसारच तुळशीला जल अर्पण करायचे असते. असे मानले जाते की जर तुम्हाला माँ लक्ष्मी सोबत भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या चुका करणे टाळावे. तर जाणून घेऊया कोणत्या चुका करणे टाळावे.

१) एकादशीला पानी अर्पण करू नये

शास्त्रानुसार एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करू नये असं म्हणतात, कारण या दिवशी माता तुळशी भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते. अशा स्थितीत जल अर्पण करून त्यांचे व्रत मोडले जाते. त्यामुळे ती रागावते आणि त्या व्यक्तीला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय एकादशीला तुळशीची पानेही तोडू नयेत असेही वास्तुशास्त्रात म्हंटल आहे. त्यामुळे तुळशीला पानी अर्पण करताना एकादशी सोडून इतर दिनी पानी अर्पण करावे.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?

२) वेळेचा मागोवा ठेवा

तुळशीला दररोज सूर्योदयापूर्वी जल अर्पण करावे असं शास्त्रात म्हटलं आहे. तर त्यानुसारचं तुळशीला पानी अर्पण करावे. शास्त्रानुसार तुळशीमातेला नेहमी सूर्योदयापूर्वी जल अर्पण करावे. आपण इच्छित असल्यास, आपण सूर्योदयाच्या वेळी देखील करू शकता. असे मानले जाते की यावेळी जल अर्पण केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. त्यामुळे तुळशीला पानी अर्पण करतेवेळी वेळेचे भान नक्की ठेवा. जेणकरून पानी घालायची वेळ निघून जाणार नाही.

(हे ही वाचा: Vastu Tips: घरात तुळशीसोबत लावा ‘ही’ रोपे; लक्ष्मीची कृपा राहील)

३) असे कपडे घालू नका

वास्तुशास्त्रानुसार असं म्हंटल जात कि, तुळशीमातेला जल अर्पण करताना असे कपडे अजिबात घालू नयेत, ज्यामध्ये शिवणकाम केले गेले असेल. जर तुम्ही असे कपडे घातलात तर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. त्यामुळे तुळशीची पूजा करताना किंवा जल अर्पण करताना नेहमी शिवणकाम केलेले कपडे घालू नये. याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणताही त्रास होणार नाही आणि तुळशीमाता देखील तुमच्यावर प्रसन्न होईल.

४) जास्त पाणी देऊ नका

वास्तुशास्त्रानुसार माता तुळशीला जास्त पाणी अर्पण करू नये. हे अशासाठी की जर आपण तुळशीला जास्त पानी अर्पण केले तर त्यामुळे तुळशीचे मूळ कुजते. त्यामुळे तुळस लवकर सुकते. जर असे झाले तर अशा स्थितीत व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुळशीला जल अर्पण करतेवेळी कमी प्रमाणात पानी घालावे. जेणेकरून तुळशीचे रोप खराब होणार नाही.

( हे ही वाचा : Vastu Shastra: घराच्या ‘या’ दिशेला लावा पोपटाचे चित्र; सर्व दोष नष्ट होतील)

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)