Dream Meanings and Interpretation: आपल्या स्वप्नांवर आपलं संपूर्ण नियंत्रण नसतं. बहुतांश वेळा ज्या गोष्टींचा आपण विचार करत असता किंवा त्या वस्तूची, व्यक्तीची धावती प्रतिमा आपल्या नजरेसमोरून गेलेली असते तेच आपल्याला स्वप्नात दिसतं. काही वेळा ही स्वप्न गोड गुलाबी असतात तर काही वेळा झोपेतून खडबडून जागं करतील अशीही असतात, कित्येकदा तर आपल्या स्वप्नांचा व वास्तवाचा काही ताळमेळही बसत नाही. पण यातील कोणतंच स्वप्न हे पूर्णतः अर्थहीन नसतं. प्रत्येक स्वप्नामागे काहीतरी अर्थ दडलेला असतो. भविष्य पुराणानुसार आपली स्वप्न आपल्या भविष्याविषयी भाष्य करू शकतात.

भविष्य पुराणानुसार स्वप्न व प्रभाव

  • भविष्य पुराणाच्या शास्त्रानुसार, सूर्याच्या उपासनेचे खूप महत्त्व आहेत. जर तुम्हाला स्वप्नात सूर्य, इंद्रधनुष्य, किंवा चंद्र दिसत असेल तर लवकरच तुम्हाला समृद्धी लाभू शकते.
  • अनेकदा आपल्याला स्वप्नात विविध रूपात शृंगाराच्या वस्तू (लिपस्टिक, पावडर, कुंकू, आरसा, दागदागिने, केस) दिसत असतील तर हे सुद्धा धनलभाचे संकेत मानले जातात.
  • तुम्हाला स्वप्नात केसगळती, भांडण,नैसर्गिक आपत्ती, व निसर्गाची विविध रूपं दिसत असतील तर जा सावधानतेचा इशारा असू शकतो.
  • स्वप्नात तुम्हाला नदी व समुद्र वारंवार दिसत असल्यास हा दीर्घायूचा शुभ संकेत असू शकतो.
  • तुम्हाला स्वप्नात प्राणी विशेषतः घोडे दिसत असतील तर हे जीवनात गतिशीलता येण्याचे संकेत ठरू शकतात
  • अनेकांना स्वप्नात मृत्यूही दिसतो. असं म्हणतात की हा अत्यंत उलट प्रभाव असतो म्हणजेच ज्या व्यक्तीचा मृत्यू तुम्हाला दिसतो त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभण्याची शक्यता असते.

धनलाभ व राजसुखाचे संकेत

भविष्य पुराणाच्या माहितीनुसार, जेव्हा आपल्याला स्वप्नात बांधलेली गाय, म्हैस किंवा सिंहिण दिसली तर ते सुखप्राप्तीचे योग असू शकतात. जर आपल्याला स्वप्नात डोकं व हात (एकाहून अधिक) दिसत असेल तर हे तुमच्या भाग्यात लक्ष्मीच्या आगमनाचे चिन्ह असू शकते.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

हे ही वाचा << २०२२ नोव्हेंबरच्या शेवटच्या ५ दिवसात ‘या’ राशींना अपार श्रीमंतीचे योग; तुम्हाला लक्ष्मीची साथ लाभणार?

स्वप्नात जर या ५ व्यक्ती दिसल्या तर…

भविष्य पुराणात सांगितल्याप्रमाणे स्वप्नात जर तुम्हाला या ५ व्यक्ती दिसल्या तर त्यांचे म्हणणे ऐकणे बहुतांश वेळा फायद्याचे ठरू शकते. या पाच व्यक्तींमध्ये देवता, तुमचे श्रद्धास्थान, महापुरुष, पूर्वज व तुम्ही स्वतः यांचा समावेश आहे.

दरम्यान, स्वप्नात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सत्य मानून त्यावर अवलंबून राहणे हा कधीच पर्याय असू शकत नाही. गीतेपासून ते वेदांपर्यंत सर्व शास्त्रांमध्ये मेहनतीला व कर्माला सर्वात जास्त महत्त्व देण्यात आले आहे. या स्वप्नांचे संदर्भ लक्षात घेऊन आपण कर्माची रूपरेषा आखू शकता.

(टीप : वरील लेख हा गृहितके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)