scorecardresearch

तुळशीची सुकलेली पाने चमकावणार नशीब; जाणून घ्या कसा करावा वापर

तुळशीच्या कोरड्या पानांनाही खूप महत्त्व आहे. चला जाणून घेऊया सुक्या तुळशीच्या पानांचे चमत्कारिक फायदे.

benefits-of-tulsi
असे मानले जाते की तुळशीमध्ये लक्ष्मीचे वास्तव्य असते. (Photo : Freepik)

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूपच पवित्र मानले जाते. तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूची पूजा संपूर्ण होत नाही. असे मानले जाते की तुळशीमध्ये लक्ष्मीचे वास्तव्य असते. तसेच दररोज तुळशीला पाणी अर्पण करणे आणि सकाळ संध्याकाळ त्याखाली दिवा लावल्याने जीवनात सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते. याशिवाय तुळशीच्या कोरड्या पानांनाही खूप महत्त्व आहे. चला जाणून घेऊया सुक्या तुळशीच्या पानांचे चमत्कारिक फायदे.

  • धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची कोरडी पानेही भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहेत. असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी तुळशीच्या एका पानाचा वापर १५ दिवसांपर्यंत केला जाऊ शकतो.
  • भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाला स्नान करताना तुळशीची सुकी पाने पाण्यात टाकता येतात. याशिवाय तुम्ही स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यात वाळलेल्या तुळशीची पाने टाकू शकता. असे मानले जाते की यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

‘या’ व्यक्तींशी वाद करणे तुमच्यासाठी ठरू शकते नुकसानदायक; आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप

  • मान्यतेनुसार तुळशीची कोरडी पाने लाल कपड्यात ठेवून तिजोरीत किंवा धनाच्या ठिकाणी ठेवल्याने लक्ष्मीची कृपा राहते. यासोबतच आर्थिक प्रगतीही होते.
  • तुळशीची सुकी पाने गंगेच्या पाण्यात टाकून घरात फवारल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्याचबरोबर घरात आनंदाचे वातावरण असते.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dry tusli leaves will brighten your luck know how to use it pvp

ताज्या बातम्या