scorecardresearch

‘शक्तीशाली त्रिग्रही योग’ बनल्यामुळे ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? गुरु आणि सूर्यदेवाच्या कृपेने मिळू शकतो अमाप पैसा

त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

Tirgrahi yog in meen
ग्रहांची युती काहींसाठी सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक ठरु शकते. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका निश्चित अंतराने गोचर करुन युती करतात. ग्रहांची ही युती काहींसाठी सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक ठरु शकते. गुरुच्या मीन राशीमध्ये बुध, गुरू आणि सूर्यदेव यांची युती तयार होणार आहे. ज्यामुळे त्रिग्रही योग तयार होईल. या योगामुळे ३ राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे. त्या तीन भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

मीन राशी –

त्रिग्रही योग तयार झाल्यामुळे मीन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा योग तुमच्या लग्न अवस्थेतच तयार होणार आहे. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व सुधारू शकते. यासोबतच तुमचा आत्मविश्वासही वाढू शकतो. या योगाची दृष्टी तुमच्या गोचर कुंडलीच्या सातव्या स्थानी पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी खूप छान आणि यशस्वी ठरू शकतो. तसेच तुम्हाला तुमच्या जोडीदाराची उत्तम साथ मिळू शकते आणि अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी –

हेही वाचा- १२ तासांनी ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? सूर्य राशीबदल करताच बक्कळ धनलाभाची शक्यता

वृश्चिक राशीतील लोकांना त्रिग्रही योग शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून पाचव्या स्थानी तयार होणार आहे, ज्याला अपत्य प्राप्ती, प्रेम-संबंध आणि उच्च शिक्षणास अनुकल मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसंच जे लोक अध्यात्माच्या क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांना चांगले यश मिळू शकते. शिवाय तुमच्या प्रेम जीवनात योग्य गोष्टी घडू शकतात आणि शैक्षणिक क्षेत्रातही प्रगती होऊ शकते.

धनु राशी –

हेही वाचा- २०२३ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग; ‘या’ राशींना होणार धनलाभ? ‘या’ रूपात दिसू शकते श्रीरामकृपा

धनु राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग लाभदायक ठरू शकतो. कारण तुमच्या गोचर कुंडलीच्या चौथ्या स्थानी हा योग तयार होणार आहे. जो भौतिक सुख आणि आईचे स्थान मानले जाते. त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुखं मिळू शकतात. यासोबतच तुम्हाला मातृपक्षाकडून आनंद आणि लाभ होऊ शकतो. वाहन सुख मिळू शकते तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. दुसरीकडे, जानेवारीपासून तुम्हाला शनीच्या साडे सतीपासून मुक्तता मिळाली आहे. त्यामुळे आता तुमची थांबलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा गृहितके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 17:25 IST