Dwidwadash Yog: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी दुर्मिळ आणि शुभ योग तयार करतात. याचा परिणाम माणसाच्या जीवनावर तसेच देश-दुनियावर दिसून येतो. द्रिक पंचांगानुसार शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ग्रहांचा राजकुमार बुध आणि कर्मफळ देणारा शनी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून ३० अंश अंतरावर असतील. त्यामुळे द्विद्वादश योग तयार होणार आहे.

जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या दुसऱ्या आणि बाराव्या भावात येतात, तेव्हा हा योग बनतो. सुमारे ३० वर्षांनंतर हा योग तयार होत आहे. या योगामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच धन-संपत्तीत मोठी वाढ होण्याचे योग आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

वृषभ राशी (Taurus Horoscope)

तुमच्यासाठी शनी आणि बुध यांचा संयोग अनुकूल ठरू शकतो. या काळात नशिबाची साथ मिळू शकते. तसेच अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

या वेळेत तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होतील. पैशाचे नवीन मार्ग खुले होतील. व्यवसायाच्या निमित्ताने लांबचा प्रवास करावा लागू शकतो आणि या प्रवासात एखादा चांगला व्यवहारही मिळू शकतो. तसेच या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत.

कर्क राशी (Cancer Horoscope)

शनी आणि बुध यांचा दुर्मिळ संयोग कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात देश-विदेश प्रवासाचे योग आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकते. तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. या काळात बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. बराच काळ अडकलेली कामे लवकर पूर्ण होतील. तसेच एखादी मनातील इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत.

तूळ राशी (Libra Horoscope)

तुमच्यासाठी शनी आणि बुध यांचा दुर्मिळ योग शुभ आणि लाभदायक ठरू शकतो. या काळात बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये ज्युनियर आणि सीनियर यांचा चांगला पाठिंबा मिळेल. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. मालमत्तेशी संबंधित वाद मिटण्याची शक्यता आहे. या काळात जीवनसाथीसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. घरात सुख-शांती आणि आनंदी वातावरण राहील. तसेच या काळात तुमची तब्येतही चांगली राहण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)