Shukra Hasta Nakshatra Transit 2026: २०२६ या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण १२ ऑगस्ट रोजी होत आहे. त्याच्या एक दिवस आधी धन, समृद्धी आणि प्रेमासाठी जबाबदार असलेला शुक्र ग्रह आपले नक्षत्र बदलणार आहे. दृक पंचांगानुसार, शुक्र ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी चंद्राच्या अधिपत्याखालील हस्त नक्षत्रात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीत असताना होणारा शपक्राचा हा बदल काही विशिष्ट राशींसाठी विशेष शुभ मानला जातो. यामध्ये वृषभ आणि कुंभ राशीसह चार राशींचा समावेश आहे. यामुळे करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाच्या बाबतीत चांगल्या संधी मिळू शकतात. शुक्र २५ ऑगस्ट २०२६पर्यंत याच नक्षत्रात राहील.
तर मग शुक्र हस्त नक्षत्रात असल्यामुळे कोणत्या ४ राशींना आर्थिक लाभ, प्रगतच्या संधी आणि प्रेम मिळेल याबाबत जाणून घेऊ…
वृषभ राशी
वृषभ राशीवर शुक्राचा स्वामी आहे आणि त्याचे हस्त नक्षत्रातील गोचर वृषभ राशीच्या व्यक्तींवर सकारात्मक परिणाम करेल. यामुळे त्यांची निर्णयक्षमता सुधारेल. तुम्ही असे अनेक निर्णय घ्याल जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. करिअरच्या नवीन संधीही निर्माण होतील. जे नोकरी करत आहेत, त्यांना नवीन नोकरी मिळण्याची आणि उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. तुमची प्रतिष्ठा वाढे. प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील.
सिंह राशी
शक्राचे हस्त नक्षत्रातील संक्रमण सिंह राशीवर सकारात्मक परिणाम करू शकते. धनवृद्धी होईल, त्यामुळे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम वाटेल. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ तुम्हाला पाठिंबा देतील. व्यावसायिकांसाठी हा फायदेशीर काळ आहे. तुमच्या योजना यशस्वी होतील. तुमच्या मेहनतीचे फळ अपेक्षेपेक्षा जास्त मिळू शकते.
मकर राशी
मकर राशीवर शनीचे अधिपत्य आहे, जो शुक्राचा मित्र ग्रह आहे. शुक्राच्या हस्त नक्षत्रातील प्रवेशाचा मकर राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. नशीब तुमच्या बाजूने असेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. दूर ठिकाणी नवीन नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. काही लोकांची बदली होऊ शकते. व्यावसायिकांना परदेशी किंवा विदेशी स्त्रोतांकडून फायदा होऊ शकतो. धार्मिक कार्यांमध्ये तुमची आवड वाढेल.
कुंभ राशी
कुंभ राशीसाठी शुक्राचे संक्रमण भूतकाळातील अनेक संकटांपासून दिलासा देईल. कामाचा भार कमी झाल्यामुळे तुम्ही भविष्यातील योजनांवर लक्ष केंद्रित करू शकाल. आयुष्य पुन्हा मार्गावर आल्यासारखे वाटेल. काम चांगले होईल, व्यवसायात वाढ होईल आणि उत्पन्न वाढेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदारावरील प्रेम वाढेल.
