Birth Date Reveals Your Success Timing : नशिबात असेल तर मिळेल असं आपण खूप सहज म्हणून जातो आणि एकेदिवशी आपण पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण होणार या आशेवर आपण सगळेच खूप कष्टाने, मेहनतीने काम करत असतो. पण, कोणाला स्मार्ट वर्क करून लवकर तर कोणाला हार्ड वर्क करून हळूहळू किंवा उशिरा यश मिळतं. त्यामुळे याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी अनेक जण ज्योतिषशास्त्राचा आधार घेतात. राशींवरुन तुम्हाला तुमचे नशीब कळू शकते. त्याच प्रमाणे अंकशास्त्रावरूनही तुम्हाला कधी यश मिळणार हे देखील तुम्ही जाणून घेऊ शकता. तर आज आपण जन्मतारखेनुसार कोणते वर्ष तुमच्यासाठी शुभ आणि भरभराटीचे ठरू शकते याबद्दल जाणून घेऊयात…

मूलांक १ (१, १०, १९ आणि २८ ) – तुम्हाला २२ ते २८ वयोगटा दरम्यान तुमच्या करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते किंवा तुम्ही एखाद्या उच्च पदावर पोहचू शकता .

मूलांक २ (२, ११, २० आणि २९ ) – २४ ते ३० वयोगटा दरम्यान तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकता आणि लग्नानंतर तुमचं नशीब आणखीन चमकू शकते.

मूलांक ३ (३, १२, २१ आणि ३० ) – तुमच्यासाठी २७ ते ३२ वयोगट हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. या काळात तुम्हाला करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते.

मूलांक ४ (४, १३, २२ आणि ३१ ) – तुमच्यासाठी ३० ते ३६ वयोगटातील काळ करिअरच्या विकासासाठी सुवर्णकाळ ठरू शकतो. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात. ३० वर्षांनंतर, तुमच्या नशिब अचानक चमकण्याची शक्यता दिसते आहे.

मूलांक ५ (५, १४ आणि २३ ) – तुम्हाला वयाच्या २१ व्या वर्षी मोठे यश मिळू शकते. जर तुम्ही योग्य दिशेने काम केले, तर ते वयाच्या २७ व्या वर्षापर्यंत आणखीन मोठे यश मिळवू शकतात.

मूलांक ६ (६, १५ आणि २४ ) – तुमची कारकीर्द वयाच्या २५ ते ३१ वर्षांदरम्यान बहरण्याची दाट शक्यता दिसून येते. या काळात प्रत्येक प्रयत्नांना यश मिळताना दिसेल. कला, मीडिया किंवा ग्लॅमरच्या जगात तुमचे स्वतःचे नाव कमावण्यात यशस्वी होऊ शकता.

मूलांक ७ (७, १६ आणि २५) – लोकांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा वयाच्या २७ ते ३४ वर्षांदरम्यान येऊ शकतो. या काळात तुम्ही कोणत्याही कामात तुमचे १०० टक्के दिल्यास, तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

मूलांक ८ (८, १७ आणि २६ ) – साधारणपणे वयाच्या ३२ वर्षांनंतरच तुम्हाला भाग्याची साथ लाभू शकते. तुम्हाला सगळ्यात उशिरा पण टिकून राहणारे यश मिळते.

अंक ९ (९, १८ आणि २७ ) – वयाच्या २६ ते ३३ वर्षांच्या दरम्यान कधीही तुम्हाला भाग्याची साथ लाभू शकते. त्यामुळे, या काळात कोणतीही संधी हातातून निसटणार नाही याची काळजी घ्या…

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती अंकशास्त्रातवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)