चाणक्य यांना कौटिल्य, विष्णुगुप्त आणि वातसायन या नावांनीही ओळखले जाते. ते तक्षशिला विद्यापीठाचे आचार्य होते. आचार्य चाणक्य यांना आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांचे विशेष ज्ञान होते, असे इतिहासकार सांगतात. चाणक्याची विद्वत्ता, कौशल्य आणि दूरदृष्टी भारतातील धर्मग्रंथ, कविता आणि इतर ग्रंथांमध्ये दिसून येते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथात आर्थिक संकटांबाबत पाच संकेत सांगितले आहेत. जर तुम्हाला सुरुवातीपासूनच संकेत समजले तर आर्थिक संकट टाळू शकता. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात या पाच धोरणांचा अवलंब केला तर तो निश्चितच गरीब होण्यापासून वाचू शकतो.

तुळशीचे रोप सुकणे: चाणक्य धोरणानुसार घरातील तुळशीची रोपे सुकणे हे आर्थिक स्थिती बिघडण्याचे लक्षण आहे. पैसा येण्याचे मार्ग बंद होऊ शकतात. असे म्हणतात की, ज्या घरात तुळशीचे रोप हिरवे असते, तिथे लक्ष्मीचा वास असतो. अन्यथा, रोप कोरडे असताना नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे तुळशीच्या रोपाची विशेष काळजी घ्यावी.

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
Loksatta anvyarth Muslim students beaten up in Savitribai Phule University Pune
अन्वयार्थ: विद्यापीठांतला राजकीय हेका
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
10th students will get extra marks What is the reason
दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार? काय आहे कारण? वाचा…

काच फुटणे: चाणक्य नीतिनुसार घरातील काच वारंवार फुटणे हे अशुभ दर्शवते. या गोष्टी आर्थिक संकटाला खतपाणी घालतात, त्यामुळे जेव्हा जेव्हा घरातील काच फुटते तेव्हा लगेच घराबाहेर फेकून द्या. तुटलेल्या आणि धुसर काचेत आपला चेहरा बघू नका.

वडिलधाऱ्यांचा अपमान: चाणक्यानुसार ज्या घरांमध्ये वडिलधाऱ्या दु:खी असतात. त्यांना योग्य सन्मान मिळत नाही. त्यांना वारंवार अपमानित केले जाते, अशा घरांची आर्थिक स्थिती चांगली राहात नाही.

Rahu Ketu 2022: राहु-केतु बदलणार राशी, या लोकांना मिळणार नशिबाची साथ

पूजा पाठ करताना मन न रमणं: चाणक्य नीतिनुसार घरातील सर्व सदस्यांनी नियमित पूजा करावी. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण देवासमोर नक्कीच नतमस्तक व्हावे. त्यामुळे घरात नकारात्मक उर्जेचा प्रवेश होत नाही. तसेच आर्थिक स्थिती चांगली राहण्यास मदत होते.

घरातील भांडणं: चाणक्य नीतिनुसार घरातील सततच्या भांडणांमुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत होते. घरात विसंवादाचे वातावरण असते, जिथे सारखी भांडणे होत असतात तिथे लक्ष्मी तिथे राहत नाहीत.