December Raj Yoga 2023 : वर्ष २०२३ च्या शेवटच्या महिन्यात अनेक राशींसाठी भाग्यवान ठरू शकतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबर महिन्यात ग्रहांनी संक्रमण केल्यामुळे अनेक राजयोग तयार होतात; ज्यामुळे अनेक राशींच्या लोकांना भाग्याची साथ मिळू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबर महिन्यात चार राजयोग तयार होणार आहेत. मंगळ, शनी, शुक्र आणि गुरू-चंद्र यांच्या संयोगाने राजयोग तयार होतो; ज्यामध्ये मंगळ एक राजयोग तयार करीत आहे. तर, शनिदेव षष्ठ राजयोग, शुक्र ग्रह मालव्य राजयोग आणि गुरू व चंद्र यांच्या संयोगाने गजकेसरी राजयोग तयार होईल. त्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच या राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. पण, कोणत्या राशींसाठी हा राजयोग भाग्यशाली ठरू शकतो ते जाणून घेऊ.
१) धनु
चार राजयोगांची निर्मिती धनु राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. या राजयोगांमुळे या राशीच्या लोकांना डिसेंबरमध्ये चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यांचे उत्पन्न वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यापारी असाल, तर तुमच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. यावेळी नोकरी आणि व्यवसायात अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे धनू राशीच्या लोकांची आर्थिक प्रतिष्ठा वाढेल आणि त्यांची रखडलेली कामे पुन्हा मार्गी लागू शकतात. यावेळी तुम्ही कोणतेही वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच या महिन्यात तुमच्या अनेक मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे.




२) तूळ
डिसेंबर महिना तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण- चार राजयोग तूळ राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतात. त्यांना कष्ट करून यश मिळू शकते तसेच मन धार्मिक कार्यात व्यग्र राहू शकता. या लोकांनी सर्व कामांमध्ये झोकून देऊन मेहनत घेतल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच या महिन्यात तूळ राशीच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच, नोकरदार लोकांचा कार्यालयात वरिष्ठांशी चांगला समन्वय राहील; ज्याचा अनुकूल परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. या महिन्यात तूळ राशीचे लोक कोणत्याही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकतात. तसेच या महिन्यात शुक्राच्या प्रभावामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्वात सुधारणा होऊ शकतात.
३) मेष
डिसेंबर महिना मेष राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. कारण- राजयोग या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू देऊ शकतो. तिथूनच त्यांच्या आयुष्यात यशाचा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. करिअरशी संबंधित उत्कृष्ट संधी मिळू शकतील. तसेच, या काळात त्यांना वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. या राशीचा स्वामी मंगळ असल्याने जमीन आणि वाहन खरेदीत यश मिळू शकते. तसेच संशोधन कार्यात गुंतलेल्यांना यावेळी चांगले यश मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)