20th September Rashi Bhavishya & Panchang : आज २० सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी रात्री ९ वाजून १६ मिनिटांपर्यंत असणार आहे. शुक्रवारी २० सप्टेंबरला तृतीया तिथी असलेल्यांचे श्राद्ध केले जाईल. तर दुपारी ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत ध्रुव योग जुळून येईल आणि दुपारी २ वाजून ४३ मिनिटांपर्यंत अश्विनी नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ पहाटे १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी १२ वाजेपर्यंत असेल. तर आज शुक्रवारी कोणच्या कुंडलीत काय सुख असणार आहे हे आपण जाणून घेऊ या…

२० सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य :

मेष:- मानसिक अस्वस्थतेत वाढ होऊ शकते. स्वत:साठी काही वेळ काढावा. सकारात्मक गोष्टी आठवून पहा. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. फक्त आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करा.

Kojagiri Purnima will shine like silver the fate of people of this zodiac sign Better days will come snk 94
कोजागिरी पोर्णिमेला चांदीसारखे चमकेल ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब! चांगले दिवस येणार
Mangal Gochar 2024 Mars will enter Moons house after 18 months three lucky zodiac signs will get immense money and wealth
१८ महिन्यानंतर मंगळ करणार चंद्राच्या घरात प्रवेश, ‘या’…
Sun Planet Transit In Tula:
कोजागिरी पोर्णिमेनंतर सुर्य देव बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा आणि पद-प्रतिष्ठा
15th October Rashi Bhavishya In Marathi
१५ ऑक्टोबर पंचांग: वैवाहिक अडथळे दूर ते कर्जमुक्ती; मंगळवारी मेष ते मीनपैकी ‘या’ राशींची होणार इच्छापूर्ती; वाचा तुमच्या कुंडलीत कसं येणार सुख
jupiter vakri in taurus
११९ दिवस नुसती चांदी; गुरूची वक्री अवस्था ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींना देणार करिअर, नोकरी अन् व्यवसायात भरपूर यश
Shukra Gochar 2024
दिवाळीनंतर शुक्र करणार धनु राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशींचे चमकणार नशीब; धनलाभासह मिळू शकते नवी नोकरी
Weekly Horoscope 14 October to 20 October 2024
Weekly Horoscope : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल हा आठवडा? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
Venus and Saturn Yuti 2024
‘या’ ३ राशी कमावणार पैसाच पैसा; दिवाळीनंतर शनी-शुक्र निर्माण करणार अद्भूत संयोग
14th October Rashi Bhavishya In Marathi
१४ ऑक्टोबर पंचांग: इच्छापूर्ती की जिद्द-चिकाटी? पंचांगानुसार आज तुम्हाला कोणत्या मार्गाने होणार लाभ; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य

वृषभ:- घरातील कामात व्यस्त राहाल. जमिनीची कामे सुरळीत पार पडतील. संपूर्ण दिवस धामधुमीत जाईल. कामाची अतिरिक्त जबाबदारी अंगावर पडू शकते. कष्टाला पर्याय नाही.

मिथुन:- अनेक दिवस भिजत पडलेले प्रश्न मार्गी लागतील. हातातील वेळेचा सदुपयोग करा. व्यापारी वर्गाला नवीन करार लाभदायक ठरतील. रोजगाराची नवीन संधी प्राप्त होईल. कार्यालयीन ठिकाणी मतभेद टाळावेत.

कर्क:- काटकसरीवर लक्ष द्या. हातातील कलेला वेळ द्यावा. घरात लोकांची उठ बस राहील. वडीलधार्‍यांचे मत ग्राह्य मानावे लागेल. कार्यालयीन सहकार्‍यांची मदत मोलाची ठरेल.

सिंह:- बोलण्यात संभ्रम येऊ देऊ नका. कौटुंबिक सौख्य जपावे. आपल्या अधिकाराची जाणीव ठेवा. व्यापारी वर्गाने संधी सोडू नये. कुटुंबातील सदस्यांबरोबर विचार विनिमय करावा.

कन्या:- घरातील वातावरण उत्साही ठेवा. जबाबदारी योग्य रीतीने पार पाडा. कौटुंबिक खर्च नियंत्रणात ठेवा. प्रिय व्यक्तीची गाठ पडेल. भागीदाराशी मतभेद संभवतात.

तूळ:- आपल्या चाणाक्ष बुद्धीची चुणूक दाखवाल. विद्यार्थ्यानी केवळ अभ्यासावर लक्ष केन्द्रित करावे. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. मिळकतीचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील. बौद्धिक कौशल्य दाखवावे लागेल.

वृश्चिक:- एकांतात काही काळ घालवावा. काही गोष्टींचे मनन चिंतन करावे. मित्रांचे योग्य वेळी सहकार्य लाभेल. भागीदारीतून लाभ शक्य होईल. झोपेची तक्रार जाणवेल.

धनू:- जुने ग्रंथ वाचनात येतील. आध्यात्मिक क्षेत्रात तल्लीन होऊन जाल. तरुण वर्गाच्या सहवासात रमाल. महत्त्वाची कामे तूर्तास टाळावीत. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.

मकर:- तुमच्या मताला मान मिळेल. पत्नीच्या सहकार्याने कामे कराल. मदतीचा आनंद मिळवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. घराबाहेर वावरतांना काळजी घ्यावी.

कुंभ:- व्यापार्‍यांना नवीन दिशा सापडेल. मनातील साशंकता काढून टाका. प्रगतीच्या दृष्टीने नवीन पाऊल उचलले जाईल. बोलताना संभ्रमीत होऊ नका. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल.

मीन:- मुलांशी वाद संभवतात. जोडीदाराची इच्छा प्रमाण मानाल. हातातील चांगली संधी सोडू नका. भागीदारीत फार विसंबून राहू नका. उगाचच चीड -चीड करू नये.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर