Saturn transit in purva-bhadrapada nakshatra: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनासोबत त्यांचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. शनी ग्रहाला न्याय आणि कर्माची देवता म्हणून ओळखले जाते. २०२४ मध्ये शनी कुंभ राशीत विराजमान असेल. ज्योतिषशास्त्रानुसार शनी १८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजून ३ मिनिटांनी पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करणार असून या चरणात तो ऑक्टोबरपर्यंत असेल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.
शनीचे नक्षत्र परिवर्तन (Saturn nakshatra transit)
मेष
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा शुभ प्रभाव मेष राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल, पैसांची तंगी दूर होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल. या काळात तुम्ही खूप सकारात्मक असाल. संपत्ती, वाहन खरेदी करु शकता. आरोग्य समस्या दूर होतील. व्यापारात हवे तसे यश मिळवाल. शनीच्या कृपेने नोकरीमध्ये प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.
मिथुन
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने मिथुन राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कार्यात यश मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. करिअरमध्ये हवे तसे यश मिळवाल. बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. आयुष्यातील अडचणी दूर होतील. या काळात तणावमुक्त असाल. स्पर्धा परिक्षेत हवे तसे यश मिळवाल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.
मकर
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने मकर राशीच्या व्यक्तींना अनेक लाभदायी परिणाम पाहायला मिळतील. या काळात आयुष्यात अनेक सुखाचे क्षण अनुभवाल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. कुटुंबीयांची साथ मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून सहकार्य प्राप्त होईल. उत्पन्नाचे नवे स्तोत्र सापडतील. पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमच्यात आत्मविश्वास आणि साहस निर्माण होईल. या काळात स्वप्नपूर्ती होण्याची शक्यता आहे. या काळ तुमच्यासाठी भाग्यकारक ठरेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)