Shani Dev Gochar 2024: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनासोबत त्यांचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. शनी ग्रहाला न्याय आणि कर्माची देवता म्हणून ओळखले जाते. शनी जवळपास एका राशीत अडीच वर्षे राहतो. शनीला संपूर्ण राशिचक्र पूर्ण करण्यासाठी तब्बल ३० वर्षांचा काळ लागतो. सध्या शनी त्याची स्वराशी असलेल्या कुंभ राशीत विराजमान असून, २९ जूनपासून शनी याच राशीत वक्री झाला आहे. तसेच आता तो येत्या १५ नोव्हेंबर रोजी कुंभ राशीतील वक्री अवस्थेतून बाहेर येणार आहे. शनीची मार्गी अवस्था काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी मानली जाते. तसेच यामुळे शश राजयोगाचा प्रभावही अधिक वाढतो. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. शनीची मार्गी अवस्था काही राशींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल.
शनीचे गोचर करणार कमाल
मेष
मेष राशीच्या व्यक्तींना शनीचे हे गोचर भाग्यदायी ठरेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर आणि व्यवसायात मानासारखे यश प्रस्थापित कराल. अडकलेले पैसे परत मिळवाल आणि कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. आरोग्य चांगले राहील. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शनीचे हे गोचर खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात सर्व समस्यांपासून सुटका होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. व्यवसायात हवी तशी प्रगती होईल.
हेही वाचा: ‘या’ ३ राशी कमावणार बक्कळ पैसा; मंगळ राशीतील बुधादित्य राजयोग देणार पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही शनीचे गोचर सकारात्मक परिणाम देणारे ठरेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. समाजात मान-सन्मान वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)