Premium

ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून ‘या’ राशींचे नशीब पालटणार? ३ ग्रह एकत्र येताच व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युतीला खूप महत्वाचे मानले जाते. कारण ग्रहांच्या युतीचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो.

rashi parivartan 2023
१९ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींचे सुखाचे दिवस? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युतीला खूप महत्वाचे स्थान आहे. कारण ग्रहांच्या युतीचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. ज्याचे काही राशींना शुभ तर राशींना अशुभ परिणाम मिळतात. अशातच १९ ऑक्टोबर रोजी ३ ग्रह एकाच राशीत येणार आहेत. या दिवशी सूर्य, बुध आणि मंगळ तूळ राशीत येणार आहेत. हे ३ ग्रह एकाच राशीत आल्यामुळे ४ राशीच्या लोकांचे नशीब पालटण्याची शक्यता आहे. शिवाय या राशींचे १९ ऑक्टोबरपासून शुभ दिवस सुरु होण्याची शक्यता आहे. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष रास –

तीन ग्रह एकाच राशीत आल्यामुळे मेष राशीच्या लोकांचा कामातील उत्साह वाढू शकतो, तसेच या काळात तुमचा धार्मिक कार्याकडे कल वाढू शकतो. तुम्हाला तुमच्या आईचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुमच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबीयांबरोबर एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता.

मिथुन रास –

मिथुन राशींच्या लोकांच्या व्यवसायात १९ ऑक्टोबरपासून वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला भावांची साथ मिळू शकते. कुटुंबात शुभ कार्ये होऊ शकतात. नोकरीतील बदलामुळे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. आयात-निर्यात व्यवसायात लाभाची संधी मिळण्यची दाट शक्यता आहे.

तुळ रास –

३ ग्रह एकाच राशीत आल्यामुळे तुमचा आत्मविश्वासात वाढ होऊ शकते. कुटुंबातील सुख-सुविधांचा विस्तार होऊ शकतो. तसेच या काळात तुमचे तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. खूप कष्ट करावे लागू शकते, नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. या काळात तुम्हाला आईचा सहवासही लाभू शकतो.

हेही वाचा- मालव्य राजयोग बनताच ‘या’ राशींचे सुरु होणार अच्छे दिन? शुक्रदेवाच्या कृपेने अचानक धनलाभाची शक्यता

धनु रास –

या काळात धनु राशीच्या लोकांच्या मनामध्ये आनंदाची भावना राहू शकते. तुम्हाला नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. या काळात तुमच्या उत्पन्न वाढ होऊ शकते. तर कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. तुम्हाला कुटुंबाकडूनही सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. कपड्यांवरील खर्चात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: From the third week of october the fate of these zodiac signs will change 3 planets come together there is a possibility of flourishing in business jap

First published on: 05-10-2023 at 18:53 IST
Next Story
मालव्य राजयोग बनताच ‘या’ राशींचे सुरु होणार अच्छे दिन? शुक्रदेवाच्या कृपेने अचानक धनलाभाची शक्यता