Gajakesari Rajyog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशीबदलामुळे अनेक शुभ-अशुभ योग तयार होत असतात. असाच एक शुभ योग ऑक्टोबर २०२६ मध्ये तयार होणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी चंद्रमा कर्क राशीत प्रवेश करणार असून या राशीत आधीपासूनच गुरु ग्रह विराजमान आहेत. त्यामुळे चंद्र आणि गुरुची युती होऊन गजकेसरी राजयोग तयार होईल.
ज्योतिषीय गणनेनुसार, ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल. हा योग ६ ऑक्टोबरपर्यंत प्रभावी राहणार आहे. या काळात काही राशींना करिअर, आर्थिक स्थिती आणि अडकलेल्या कामांमध्ये सकारात्मक बदल जाणवू शकतात, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते.
गजकेसरी राजयोगामुळे कोणत्या राशींना फायदा?
चंद्राला मन आणि भावना यांचा कारक, तर गुरु ग्रहाला ज्ञान, विस्तार आणि समृद्धीचा कारक मानले जाते. त्यामुळे या दोन्ही ग्रहांची युती काही राशींसाठी विशेष ठरू शकते. तूळ, मकर, कुंभ आणि मीन या चार राशींना या योगाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
तूळ राशी
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. काही दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल ठरू शकतो. योग्य नियोजन केल्यास आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या चांगले बदल घडू शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी किंवा महत्त्वाचे काम मिळू शकते. या जबाबदारीतून भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. वैवाहिक जीवनातही सकारात्मक वातावरण राहू शकते.
कुंभ राशी
गजकेसरी राजयोगामुळे कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. उत्पन्न वाढल्याने बचत आणि बँक बॅलन्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा जबाबदारीत वाढ मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांना गुरु-चंद्राच्या युतीचा लाभ मिळू शकतो. नोकरी किंवा करिअरमध्ये नवीन संधींची दारे उघडू शकतात. काही काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे होऊ शकते.
