Gajkesari Yog: ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे सहा दिवस राहतो आणि त्याच महिन्यात तो परत कोणत्या तरी राशीत जातो. चंद्राने राशी परिवर्तन केल्यामुळे कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी युती होते. तर गुरू आणि चंद्राची युती अत्यंत शुभ मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र २९ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजून ८ मिनिटांनी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. जो २ ऑक्टोबरला सकाळी १२ वाजून १४ मिनिटापर्यंत त्याच राशीत राहणार आहे. तर मेष राशीत गुरू आधीपासूनच विराजमान आहे. अशातच आता गजकेसरी योग तयार होत आहे. गजकेसरी योगाची निर्मिती अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकते. गजकेसरी योग तयार झाल्यामुळे कोणत्या राशींना विशेष लाभ होऊ शकतो ते जाणून घेऊ या.
मेष रास –




मेष राशीत गुरू वक्री अवस्थेत आहे. तसेच चंद्राच्या आगमनाने गजकेसरी योग तयार होत आहे. या शुभ योगाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद येऊ शकतो. धनवृद्धीमुळे दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात तसेच नशिबाच्या साथीने तुमची प्रतिष्ठा वाढू शकते.
मिथुन रास –
मिथुन राशीच्या लोकांना गजकेसरी योग बनल्याचा विशेष लाभ होऊ शकतो. या राशीमध्ये गुरु अकराव्या स्थानी आहे. अशा स्थितीत गजकेसरी योग तयार झाल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासह तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकते.
सिंह रास –
सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात गजकेसरी योग आनंद आणू शकतो. या काळात तुम्ही कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवण्यासाठी बाहेर सहलीला जाऊ शकता. तुम्हाला व्यवसायातही जास्त नफा मिळू शकतो. नोकरदारांना प्रमोशनही मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)