Gajalakshmi Rajyog 2026 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र आणि गुरु ग्रहाची युती अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. २ जून २०२६, मंगळवार रोजी पहाटे २ वाजून २५ मिनिटांनी गुरु ग्रह कर्क राशीत गोचर (प्रवेश) करणार आहे. यानंतर, ८ जून २०२६, सोमवार रोजी संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी शुक्र ग्रह देखील कर्क राशीत प्रवेश करेल. अशाप्रकारे, ८ जून रोजी कर्क राशीत दोन्ही ग्रहांच्या एकत्र येण्याने अत्यंत शुभ अशा ‘गजलक्ष्मी राजयोगा’ची निर्मिती होईल. या योगाचा ४ राशींवर विशेष सकारात्मक प्रभाव पाहायला मिळेल.

१. वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीचा स्वामी ग्रह ‘शुक्र’ आहे. शुक्र आणि गुरुच्या या युतीमुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. करिअर आणि व्यवसाय क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळेल. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. एकूणच हा राजयोग तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल.

२. कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग अत्यंत फलदायी ठरू शकतो. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल. मानसिक ताणतणाव कमी होऊन तुम्ही करिअरमध्ये वेगाने प्रगती करू शकाल.

३. कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग फायदेशीर ठरू शकतो. या काळात कन्या राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. आर्थिक स्थिती कमालीची मजबूत होईल. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे किंवा थकीत रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना एखादी मोठी डील मिळाल्याने मोठा नफा होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी हा काळ सर्वोत्तम असून, भविष्यात चांगला परतावा मिळेल.

४. मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी देखील हा योग अत्यंत फलदायी ठरणार आहे. या काळात विद्यार्थ्यांना शिक्षणात उत्तम यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. अचानक धनलाभाचे योग येतील. विवाहित व्यक्तींना संततीकडून एखादी आनंदाची बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)