Gajkesari Rajyog 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गजकेसरी योग हा एक अत्यंत शुभ योग मानला जातो. हा योग चंद्र आणि गुरू यांच्या युतीने तयार होतो. १८ मे रोजी चंद्राने मिथुन राशीत प्रवेश करताच हा शुभ योग तयार होईल. हा योग २० मेपर्यंत टिकेल. या योगामुळे १२ पैकी चार राशींच्या लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल. ???त्यांची आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारेल, ज्यामुळे आर्थिक लाभाचे मार्ग खुले होतील. (की- त्यांच्या आर्थिक लाभाचे मार्ग खुले होतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारेल.)??? पण, नेमक्या कोणत्या राशींच्या लोकांना हा योग सर्वांत जास्त फायदेशीर ठरेल ते जाणून घेऊ…

वृषभ

गजकेसरी राजयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरेल. त्यांच्या कामांना गती प्राप्त होईल. तुमची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरीत्या मजबूत होईल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही चांगला नफा मिळू शकतो. भागीदारीचे काम खूप फायदेशीर ठरेल. कुटुंबात आनंदाचे आणि शांत वातावरण असेल.

कर्क

हा योग कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. या काळात त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील. प्रवासातून भरीव नफा मिळेल. एक मोठा व्यावसायिक करार अंतिम होऊ शकतो. तुमचा जोडीदार प्रत्येक प्रयत्नात तुम्हाला पाठिंबा देईल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता.

कन्या

गजकेसरी योग कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधीचे वाद मिटतील. अचानक आर्थिक लाभ होण्याचे शुभ संकेत मिळत आहेत. न्यायालयीन खटल्यांमध्ये तुम्हाला यश मिळेल.

मीन

गजकेसरी योगाचा मीन राशीला मोठा फायदा होईल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही जुन्या कर्जातून मुक्त होऊ शकता. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला व्यवसायात अनेक सुवर्णसंधी मिळू शकतात. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. तुम्ही दीर्घकालीन आजारातूनही मुक्त होऊ शकता.

(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)