Mercury Transit Makes Gajkesari Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह हा वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. काही ग्रह गोचर करून एखाद्या राशी किंवा नक्षत्रात स्थिर होतात पण तरीही ते स्तब्ध होतात असे नाही. ग्रहांच्या चालीनुसार अनेकदा वेगवेगळे राजयोग तयार होत असतात. येत्या दोन दिवसात असाच एक अत्यंत शुभ असा गजकेसरी राजयोग तयार होत आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार ७ जून २०२३ ला वृषभ राशीत बुध गोचर होणार आहे तर मकर राशीत गुरु व चंद्राची युती होऊन गजकेसरी राजयोग तयार होत आहे. या दोन्हीच्या प्रभावाने काही राशींच्या भाग्याचे दार उघडण्याची शक्यता आहे. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया…
गजकेसरी राजयोग बनल्याने ‘या’ राशींच्या कुंडलीला मिळेल कलाटणी?
वृषभ रास (Taurus Zodiac)
वृषभ राशीतच बुध गोचर झाले आहे तर गजकेसरी राजयोग सुद्धा वृषभ राशीच्या गोचर कुंडलीत नवव्या स्थानी प्रभावी असणार आहे. हे स्थान भाग्य व स्थानबदलाचे मानले जाते. याकाळात आपल्याला नशिबाची तगडी साथ लाभू शकते ज्यामुळे तुमची अनेक अडकून पडलेली कामे मार्गी लागू शकतात. नोकरदार मंडळींना आयुष्यात नव्या संधी मिळवून देणारी एखादी घटना अनुभवता येऊ शकते. तसेच आयुष्यभर कामी येतील अशा काही ओळखी सुद्धा होऊ शकतात. तुम्हाला आयुष्यात येणाऱ्या नव्या व्यक्तींच्या रूपातून तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. येत्या काळात आपण परदेशात प्रवास करू शकता.
तूळ रास (Libra Zodiac)
तूळ राशीच्या गोचर कुंडलीत गजकेसरी राजयोग हा चतुर्थ भावी तयार होत आहे. यामुळे आपल्याला येत्या काळात वाहन व प्रॉपर्टीच्या खरेदीचे योग आहेत. येत्या काळात कामाच्या व वैयक्तिक अशा दोन्ही बाजूंनी तुम्हाला आनंद व नवनवीन संधी लाभण्याची चिन्हे आहेत. समाजात मान- सन्मान वाढीस लागल्याने आपण समाधानी आययुष्य जगू शकता. या कालावधीत शेअर बाजारात गुंतवणुकीला प्राधान्य दिल्या येत्या काळात मोठा नफा मिळू शकतो. तुम्हाला आई वडिलांच्या रूपात एखादा मार्गदर्शक लाभू शकतो.
हे ही वाचा<< १८ महिने गुरु ग्रह ‘या’ राशींचे आयुष्य सोनपावलांनी बदलणार? कोणत्या टप्प्यावर सर्वाधिक धनलाभाची संधी, जाणून घ्या
धनु रास (Sagittarius Zodiac)
धनु राशीसाठी गजकेसरी राजयोग हा अनुकूल व शुभ सिद्ध होऊ शकतो. आपल्या राशीच्या अगदी दुसऱ्याच स्थानी हा राजयोग तयार झाल्याने प्रभाव सुद्धा दुप्पटीने दिसण्याची संधी आहे. येत्या काळात तुम्ही वाहन खरेदी करू शकता. सोन्याच्या खरेदीसाठी सुद्धा लाभदायक काळ आहे.. तुमच्या आयुष्यात एखाद्या नव्या बदलाची चिन्हे आहेत. विवाह करू आवडेल असे एखादे स्थळ चालून येऊ शकते. तुमच्या राशीच्या कुंडलीत प्रेम विवाहाचे सुद्धा योग आहेत.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.