Gajkesari Rajyoga 2026 Jupiter and Moon conjunction: वैदिक ज्योतिशास्त्रात अनेक शुभ राजयोग काही राशींच्या लोकांच्या जीवनात फार सकारात्मक बदल घडवून आणतात. व्यक्तीच्या जीवनात मान, प्रतिष्ठा आणि भौतिक सुखसोई येऊ शकतात. त्यात २१ एप्रिलपासून गजकेसरी राजयोग तयार होत आहे. चंद्र आणि गुरू यांच्या युतीने हा योग तयार होतोय. पंचांगानुसार, २१ एप्रिल रोजी मिथुन राशीत चंद्र आणि गुरूच्या संयोगाने गजकेसरी राजयोग तयार होईल.
पंचांगानुसार, २१ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता चंद्र मिथुन राशीत प्रवेश करील, जिथे गुरू आधीच उपस्थित आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग निर्माण होईल.
मिथुन
गजकेसरी राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात तुमच्या करिअरमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचीही शक्यता आहे. व्यवसायातील नवीन करार किंवा भागीदारी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. या काळात तुमची संवाद कौशल्ये तुम्हाला पुढे नेतील आणि तुम्हाला आदर व सन्मानही मिळू शकेल. विवाहित व्यक्तींना सुखी वैवाहिक जीवन लाभेल, अशी अपेक्षा आहे.
परंतु, या काळात तुम्ही अति आत्मविश्वास बाळगणे टाळावे. कारण- त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. खर्च वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.
कन्या
गजकेसरी राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतो. या काळात तुम्हाला भाग्याची साथ लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. करिअरमध्ये स्थिरता येण्याची शक्यता आहे आणि नोकरीच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नफा आणि विस्तार होण्याचे संकेत आहेत. या काळात तुम्ही कामानिमित्त किंवा कुटुंबासह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकता. तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्येही सहभाग होऊ शकता.
मात्र, या काळात कामाच्या दबावामुळे तुमचा मानसिक ताण वाढू शकतो. तसेच, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. कारण- झोपेची कमतरता आणि थकवा यांमुळे समस्या निर्माण होऊ शकतात.
सिंह
गजकेसरी राजयोग सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. या काळात तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या नेतृत्वाची प्रशंसा होऊ शकते. तसेच मोठे व्यावसायिक निर्णय फायदेशीर ठरू शकतात. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांसंबंधी चांगली बातमीदेखील मिळू शकते.
परंतु, या वेळी तुम्ही अहंकार टाळावा. कारण- घाईने निर्णय घेणे हानिकारक ठरू शकते. कौटुंबिक जीवनात किरकोळ वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संयम बाळगा.
(टीप – वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
