Lucky Zodic Signs: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ग्रहांच्या गोचरामुळे कधी कधी एकाच राशीत दोनपेक्षा जास्त ग्रहांच्या युतीमुळे राजयोग निर्माण होतात.
दरम्यान, आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोणातून अत्यंत खास मानला जाईल. चंद्राच्या गोचराबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने मीन राशीत प्रवेश केला असून या राशीत आधीपासूनच शनीदेव उपस्थित आहे. शिवाय, शुक्राच्या कर्क राशीतील प्रवेशामुळे गुरू-शुक्र युतीने तयार झालेला शक्ती ‘गजकेसरी योग’ देखील निर्माण झाला आहे. उर्वरित ग्रहांची स्थिती ७ जून रोजी जशी होती तशीच आहे.
पंचांगानुसार, मंगळ मेष राशीत, सूर्य वृषभ राशीत, बुध मिथुन राशीत, केतू सिंह राशीत आणि राहू कुंभ राशीत. ९ जून रोजीच्या या ग्रहयोगांमुळे पाच राशींना सर्वाधिक लाभ होण्याची शक्यता आहे.
आजचा दिवस ‘या’ राशींसाठी खूपच खास
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी हे योग खूप फायदेशीर ठरतील. आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी या योगाचा शुभ प्रभाव अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अधिक लाभदायी सिद्ध होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी असेल. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.
वृश्चिक (Vruschik Rashi)
वृश्चिक राशीचे लोकांसाठी हा योग लाभप्रद ठरेल. न्यायालयीन कामकाज, परवाने, नोंदणी किंवा कागदपत्रांशी संबंधित बाबींना गती मिळू शकते. आज एक जुनी कौटुंबिक आठवण उपयोगी पडेल. स्थानिक पातळीवर तुमचा प्रभाव वाढेल. तुमच्या परिसरात जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासोबतच स्पर्धेत किंवा रंगमंचावर आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात, मोकळ्या संवादामुळे जुने संशय दूर होतील.
मीन (Meen Rashi)
मीन राशीच्या लोकांसाठी देखील हा योग लाभदायी ठरेल. व्यवसायातील कोणताही नवीन ग्राहक थेट नफा आणू शकत नाही परंतु भविष्यासाठी एक मोठा मार्ग उघडू शकतो. तुम्हाला कुटुंबातील सदस्याची नोकरी, लग्न किंवा शिक्षणाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. भाडेकरू, घर किंवा जमिनीशी संबंधित अडकलेले प्रकरण पुढे सरकेल. डिजिटल प्लॅटफॉर्मचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. भविष्याबाबत तुमचा दृष्टीकोन अधिक व्यावहारिक आणि मजबूत होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
