scorecardresearch

Premium

Ganadhipa Sankasthi Chaturthi: गणाधिप संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

गणाधिप संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या…

Ganadhipa Sankasthi Chaturthi 2023 date puja muhurat sarvartha siddhi yoga moonrise time and importance of sankashti chaturthi
Sankashti Chaturthi vrat गणाधिप संकष्टी चतुर्थी कधी आहे? गणाधिप संकष्टी चतुर्थी ३ शुभ योग, संकष्टी चतुर्थी पूजा मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ (Photo : Pixabay)

Sankashti Chaturthi 2023: मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गणाधिप संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणरायाची पूजा केल्याने सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. यंदा गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ३ शुभ योग तयार होत आहेत. या संकष्टी चतुर्थीला रात्री चंद्राची पूजा करण्याचीही एक परंपरा आहे. चंद्रदेवाला अर्ध्य दिल्याशिवाय व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, असे मानले जाते. यानिमित्ताने गणाधिप संकष्टी चतुर्थी कधी आहे? तिथी, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ याबाबत जाणून घेणार आहोत.

गणाधिप संकष्टी चतुर्थी २०२३ तिथी आणि शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी २.२४ पासून सुरू होईल, ती शुक्रवार १ डिसेंबर रोजी दुपारी ३.३१ वाजता समाप्त होईल. उदयतिथीच्या आधारे गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत ३० नोव्हेंबर रोजी पाळले जाईल, कारण चतुर्थी तिथीचा चंद्रोदय ३० नोव्हेंबरलाच होत आहे.

Shukra Nakshatra Gochar
धन-संपत्तीचा कारक शुक्रदेवाच्या नक्षत्र बदलामुळे धनलक्ष्मी ‘या’ ४ राशींच्या नशिबाला देईल कलाटणी? तुम्हाला आहे का ही संधी?
Sun Planet Made Ubhayachari Rajyoga
५०० वर्षांनी सूर्यदेवाने ‘उभयचरी राजयोग’ बनवल्याने ‘या’ राशींवर वैभव व धनलक्ष्मी होईल प्रसन्न? मिळू शकते गोड बातमी
basant panchami 2024 gajakesari and panch divya yoga make these zodiac sign happy maa lakshmi blessings in rashi
वसंत पंचमीला लक्ष्मी नारायणसह निर्माण होणार पंच दिव्य योग! माता लक्ष्मीची होईल ‘या’ राशींवर कृपा
Maghi Ganesh Jayanti 2024 Date Time Puja Muhurat in Marathi
Maghi Ganesh Jayanti 2024: यंदा माघी गणेश जयंती कधी आहे? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ

गणाधिप संकष्टी चतुर्थीतील ३ शुभ योग

यावर्षी गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ३ शुभ योग तयार होत आहेत. त्या दिवशी दुपारी ०३.०१ पासून सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे, जो दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.५६ पर्यंत राहील. शुभ योग सकाळपासून रात्री ०८.१५ पर्यंत आहे, तर शुक्ल योग रात्री ०८.१५ ते दुसऱ्या दिवशी रात्री ०८.०४ पर्यंत आहे.

गणाधिप संकष्टी चतुर्थीसाठी पूजा मुहूर्त

गणाधिप संकष्टी चतुर्थीला सकाळी पूजा केली जाईल. त्यावेळी शुभ योग राहील. त्या दिवशीचा शुभ मुहूर्त सकाळी ०६.५५ ते ०८.१४ पर्यंत आहे. लाभ-उन्नती मुहूर्त दुपारी १२.१० ते ०१.२८ पर्यंत आणि अमृत-सर्वोत्तम मुहूर्त दुपारी ०१.२८ ते ०२.४७ पर्यंत आहे.

गणाधिप संकष्टी चतुर्थी २०२३ चंद्रोदय वेळ

३० नोव्हेंबर रोजी गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या रात्री ०७.४५ वाजता चंद्रोदय होईल. यावेळी चंद्राला अर्ध्य अर्पण करून व्रत पूर्ण होईल, त्यानंतर पारणा होईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ganadhipa sankasthi chaturthi 2023 date puja muhurat sarvartha siddhi yoga moonrise time and importance of sankashti chaturthi sjr

First published on: 29-11-2023 at 17:45 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×