Ganesh Chaturthi Horoscope: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षी गणेश चतुर्थीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. १४ सप्टेंबरला गणेशोत्सवाच्या काळात मालव्य, भद्र राजयोगासह हंस राजयोग आणि रवि योग तयार होत आहेत. याशिवाय बुध आणि अरुण यांच्या संयोगातून नवपंचम राजयोग तयार होत आहे. या दिवशी बुध आणि अरुण एकमेकांपासून १२० अंशांवर असल्यामुळे नवपंचम राजयोग तयार होईल.

अशा परिस्थितीत काही राशींच्या लोकांवर गणपती बाप्पाची विशेष कृपा होऊ शकते. त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी येऊ शकते. हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारावर केले जात आहे. चला जाणून घेऊया, नवपंचम राजयोग कोणत्या राशींसाठी शुभ ठरू शकतो…

द्रिक पंचांगानुसार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ०८:०७ वाजता बुध आणि अरुण १२० अंशांवर असतील. त्यामुळे नवपंचम राजयोग तयार होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी बुध आपल्या स्वराशी कन्यामध्ये आणि अरुण वक्री अवस्थेत वृषभ राशीत विराजमान असेल.

मेष राशी (Aries Zodiac Sign)

मेष राशीच्या लोकांसाठी हा राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या सहाव्या भावात बुध आणि दहाव्या भावात अरुण विराजमान आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना या काळात नशिबाची साथ मिळू शकते. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. यासोबतच व्यापाऱ्यांनाही चांगला नफा मिळू शकतो. एखादा मोठा करार होऊ शकतो.

भागीदारीत सुरू असलेल्या व्यवसायातूनही चांगला फायदा मिळू शकतो. मान-सन्मानातही वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवता येईल. कुटुंबीय किंवा मित्रांसोबत धार्मिक यात्रेला जाण्याची संधी मिळू शकते. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. त्यामुळे भविष्यासाठी बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता.

वृषभ राशी (Taurus Zodiac Sign)

वृषभ राशीच्या लोकांसाठीही गणेश चतुर्थीचा दिवस चांगला ठरू शकतो. या राशीच्या गोचर कुंडलीच्या पाचव्या भावात बुध आणि लग्न भावात अरुण विराजमान असतील. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते.

नोकरी करणाऱ्या लोकांच्या मेहनतीचे आणि कामाचे कौतुक होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. यासोबतच बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. अध्यात्माकडेही तुमचा कल वाढू शकतो. तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यात यशस्वी होऊ शकता. समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.

कन्या राशी (Virgo Zodiac Sign)

कन्या राशीच्या लोकांसाठी बुध आणि अरुण यांच्या संयोगातून तयार होणारा नवपंचम राजयोग अनेक बाबतीत खास ठरू शकतो. या राशीच्या गोचर कुंडलीत बुध लग्न भावात आणि अरुण नवव्या भावात भ्रमण करत आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात नशिबाची साथ मिळू शकते. मात्र, मेहनत केल्याशिवाय काहीही मिळत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे काम, व्यवसाय आणि इतर क्षेत्रांतही मेहनत आणि सातत्य ठेवत राहा. यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. लग्न भावात बुध असल्यामुळे तुमच्या बौद्धिक क्षमतेत वेगाने वाढ होऊ शकते.

मकर राशी (Capricorn Zodiac Sign)

मकर राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप शुभ ठरू शकतो. या राशीच्या गोचर कुंडलीत बुध नवव्या भावात आणि पाचव्या भावात वक्री अवस्थेत वरुण विराजमान असतील. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग सोने पे सुहागासारखा ठरू शकतो. या राशीच्या लोकांची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्यासोबतच कर्जातूनही सुटका होऊ शकते.

उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग खुले होऊ शकतात. यासोबतच आयुष्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी आणि संघर्षही कमी होऊ शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ फायदेशीर ठरू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. आरोग्यही चांगले राहण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)