7th September Rashi Bhavishya & Panchang : देशभरातील नागरिक इतक्या दिवसांपासून ज्या दिवसाची वाट पाहत होते अखेर तो क्षण आज आला आहे. आज ७ सप्टेंबर २०२४ रोजी ‘गणेशोत्सव’ सणाला सुरुवात होते आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी ‘श्री गणेश चतुर्थी’ साजरी केली जाते. चतुर्थी तिथी आज संध्याकाळी ५ वाजून ३८ मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज ब्रह्मयोग जुळून येणार आहे ; जो रात्री ११ वाजून १६ मिनिटांपर्यंत असेल. आज शनिवारी चित्रा नक्षत्र दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तसेच आज अभिजित मुहूर्त ११ वाजून ४४ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ३२ मिनिटांपर्यंत असेल. तसेच शनिवारी पहाटे ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. तर आज गणपती बाप्पा कोणाच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येणार हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

७ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य :

मेष:- घरात सजावटीची कामे कराल. आपल्या स्मरणशक्तीचा फायदा होईल. दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल. धनलाभाचे योग जुळून येतील. मित्रांशी गप्पा मारण्यात वेळ घालवाल.

वृषभ:- काही नवीन शिकण्याचा योग येईल. स्वत:ला कामात गुंतवून घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. मित्रांची बाजू जाणून घ्या. घरात टापटीप ठेवाल.

मिथुन:- कौटुंबिक मदत लाभेल. दिवस समाधानात जाईल. महत्त्वाच्या कामाची अंमलबजावणी कराल. आर्थिक व्यवहारांकडे दुर्लक्ष नको. हस्त कलेसाठी वेळ काढावा.

कर्क:- हातातील काम जिद्दीने पूर्ण कराल. व्यापार्‍यांची जुनी कामे मार्गी लागतील. घरातील वातावरण खेळकर राहील. नातेवाईकांची गाठ पडेल. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा.

सिंह:- सल्ला मागणार्‍यांना योग्य मार्गदर्शन करा. प्रेमातील व्यक्तींना शुभ दिवस. जवळच्या ठिकाणी फिरायला जाल. समोरील गोष्टीत आनंद माना. घरगुती खर्च आटोक्यात ठेवा.

कन्या:- कामाचा ताण लक्षात घ्यावा. घरगुती गप्पांमध्ये गुंग व्हाल. उत्तम निद्रा सौख्य लाभेल. चर्चेतून मार्ग काढता येईल. जोडीदाराची बाजू जाणून घ्या.

तूळ:- दिवसभर कामात अडकून राहाल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. सर्वांशी गोडीने बोलाल. झोपेची तक्रार राहील. आजचा दिवस चांगला जाईल.

वृश्चिक:- लहान प्रवास घडेल. दिवस संमिश्र जाईल. रागाला आवर घालावी. मन विचलीत करणार्‍या घटना घडू शकतात. फसवणुकीपासून सावध राहावे.

धनू:- हातातील काम मनापासून करावे. मनातील इच्छा पूर्ण होईल. तरुण वर्गाकडून काही शिकायला मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. धार्मिक भावना वाढीस लागेल.

मकर:- सर्व खात्री करूनच जबाबदारी घ्या. बाहेर फिरताना सतर्क राहावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन करा. व्यापारीवर्ग खुश राहील.

कुंभ:- नवीन कामासाठी संकल्प करावा. अनावश्यक खर्च टाळावा. बोलताना भान राखावे. संमिश्र घटनांचा दिवस. कौटुंबिक अडचणींकडे लक्ष द्या.

मीन:- विद्यार्थ्यांना नवीन अनुभव मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील. अनावश्यक खर्च टाळावा. मनातील निराशेला दूर सारा.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi vishesh rashibhavishya on 7th september bappa will blessed you with money gold love success read marathi daily horoscope asp
Show comments