11th September Rashi Bhavishya & Panchang : आज ११ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी ११ वाजून ४५ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. आज मंगळवारी प्रीती योग रात्री ११ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर ज्येष्ठा नक्षत्र रात्री ९ वाजून २० मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. आज राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते दुपारी १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच देशभरात गणेशोत्सवा दरम्यान उत्साह पाहायला मिळत आहे. भाद्रपद महिन्यातील श्रीगणेश चतुर्थीला जोडूनच जेव्हा अनुराधा नक्षत्र असेल त्यादिवशी गौरी आवाहन मग नंतर गौरी पूजन असते आणि शेवटी गौरी विसर्जनाने समाप्ती होते. तर आज गौरी पूजन असणार आहे. तर आजचा शुभ दिन मेष ते मीनच्या आयुष्यात काय घेऊन येणार हे आपण जाणून घेऊ या…

११ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य :

मेष:- जोडीदारामुळे आपला लाभ होईल. महत्त्वाच्या कामात त्यांची मदत घ्या. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. दिवस परोपकारात व्यतीत होईल. सकारात्मक राहून केवळ आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करा.

वृषभ:- खर्चावर नियंत्रण ठेवा. अनाठायी खरेदी टाळा. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. मित्रांच्या भेटीचा आनंद घ्याल. प्रलंबित कामे मार्गी लावू शकाल.

मिथुन:- जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. वडीलांच्या आशीर्वादाने मनातील इच्छा पूर्ण होईल. आपले मनोबल वाढीस लागेल. नोकरीत बदल करू इच्छिणार्‍यांना चांगली संधी मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

कर्क:- जोडीदाराशी सामंजस्याने वागा. छोट्या गोष्टीतील मतभेद टाळा. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. मान, प्रतिष्ठा वाढीस लागेल. वरिष्ठांची मर्जी ओळखून कामे करा.

सिंह:- स्पर्धेत यश मिळवाल. आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. प्रलंबित येणी प्राप्त होतील. व्यवसायिकांना फायदा देणार्‍या संधी समोर यातील. आनंदी दृष्टीकोन बाळगून राहाल.

कन्या:- नातेवाईकांच्या ओळखीचा लाभ होईल. आपले विचार लोकांसमोर मांडा. घेतलेले निर्णय लाभ मिळवून देतील. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. उगाचच चिडचिड करू नका.

तूळ:- लोक तुमच्या कामात ढवळाढवळ करू शकतात. आपले निर्णय स्वत: घ्या. मिळकतीच्या नव्या संधी सामोर्‍या येतील. आपले स्पष्ट मत मांडाल. धावपळ व दगदग वाढेल.

वृश्चिक:- घरातल्या गोष्टींमध्ये विशेष लक्ष घाला. माहितगार लोकांना आपल्या विचारात सामील करून घ्या. प्रलंबित कामे मार्गी लावाल. बोलताना तारतम्य बाळगा. मित्राची भेट उपयुक्त ठरेल.

धनू:- नोकरी, व्यवसायात उत्तम संधी लाभेल. अडकलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल. कार्यालयीन सहकार्‍यांशी सलोखा ठेवावा. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल.

मकर:- मानसिक स्वास्थ्य जपावे. धार्मिक भावना वाढीस लागेल. कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडाल. भावंडांशी मतभेदाची शक्यता.

कुंभ:- व्यावसायिक नव्या जोमाने कामे करतील. दिवसाची सुरुवात धावपळीत होईल. अचानक खर्च उदभवतील. प्रतिकूलतेत संयम बाळगावा. नामस्मरण उपयुक्त ठरेल.

मीन:- नोकरीची संधी चालून येईल. उगाच चिडचिड करू नका. छोटे प्रवास लाभदायक ठरतील. दिवस धावपळीत जाईल. औद्योगिक वाढ सुखकारक ठरेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gauri pujan vieshesh rashibhavishya priti yog blessed you with love money success and read marathi daily horoscope asp
Show comments