Gaytri Jayanti 2026: आज, गुरुवार, २५ जून २०२६ रोजी निर्जला एकादशी तसेच गायत्री जयंती आहे. आज भद्रा देखील असेल. दरम्यान, मन आणि भावनांशी संबंधित असलेला चंद्र ग्रह गोचर करेल. असे मानले जाते की जेव्हा जेव्हा चंद्र गोचर करतो, तेव्हा राशींच्या जीवनात बदल घडतात. पंचांगानुसार, आज, २५ जून २०२६ रोजी, सकाळी ७:०८ ते रात्री ८:०९ पर्यंत असेल, भद्राकाळ असेल. याच काळात दुपारी ४:२८ वाजता चंद्र विशाखा नक्षत्रात प्रवेश करेल. चंद्र उद्या, शुक्रवार, २६ जून २०२६ रोजी सायंकाळी ७:१५ पर्यंत या नक्षत्रात राहील. दरम्यान, चंद्राचे आज होणारे नक्षत्र परिवर्तन नक्कीच १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल.

गायत्री जयंतीचे गोचर भाग्य बदलणार

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी गायत्री जयंतीचे गोचर अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. घरात शुभ कार्ये होतील. वैवाहिक आयुष्यदेखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत.

तूळ (Tula Rashi)

हा योग तूळ राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील. हा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल.

वृश्चिक (Vruschik Rashi)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप अनुकूल असेल. धन-संपत्तीत प्रचंड वाढ होईल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते, ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

मकर (Makar Rashi)

मकर राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)