Girls Born on These Dates Are Considered Lucky in Numerology: काही लोकांच्या आयुष्यात पैसा, आनंद व यश जणू आपोआप चालत येतं, असं अनेकदा म्हटलं जातं. विशेष म्हणजे काही मुलींबाबत तर ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की, त्यांच्या पावलांनी घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. त्या ज्या घरात जातात, तिथे आनंदाचं वातावरण निर्माण होतं आणि कुटुंबाच्या प्रगतीला वेग मिळतो.
अंकज्योतिषशास्त्रानुसार, अशा काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या मुलींवर शुक्र ग्रहाची विशेष कृपा असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या मुली केवळ नशिबवानच नसतात, तर त्यांच्या उपस्थितीमुळे कुटुंबातही चांगले बदलही घडू लागतात, अशी मान्यता आहे.
या मुलींचा स्वभाव अतिशय शांत, प्रेमळ आणि समजूतदार असल्याचं म्हटलं जातं. त्या घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतात आणि आपल्या वागण्या-बोलण्यानं सगळ्यांची मनं जिंकतात. त्यामुळे त्या सासरी गेल्यानंतर काही दिवसांतच घरातील लाडक्या बनतात.
ज्योतिषशास्त्रात असंही मानलं जातं की, या मुलींच्या भाग्यामुळे त्यांच्या पतीच्या करिअरमध्येही प्रगती होऊ शकते. घरातील आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणे, नवीन संधी मिळणं किंवा व्यवसायात वाढ होणं अशा गोष्टी त्यांच्या आगमनानंतर अनुभवायला मिळतात, अशी अनेकांची धारणा असते. मात्र, हे सर्व श्रद्धा आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
या मुली घर व्यवस्थित ठेवण्यातही पटाईत मानल्या जातात. स्वच्छता, सजावट आणि सकारात्मक वातावरण ठेवण्याकडे त्यांचा विशेष कल असतो. त्यामुळे घरात कायम आनंदी आणि प्रसन्न वातावरण राहिल्याचं म्हटलं जातं. त्यांचा स्वभाव मृदू, हसतमुख आणि मिळून-मिसळून राहणारा असतो. त्यामुळे त्या जिथे जातात, तिथे सहजपणे आपली वेगळी ओळख निर्माण करतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी प्रेमानं वागण्याची त्यांची सवय असल्यामुळे त्या सर्वांच्या आवडत्या होतात.
अंकज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला ऐश्वर्य, सौंदर्य, प्रेम आणि सुख-सुविधांचा कारक मानलं जातं. त्यामुळे ज्या मुलींवर शुक्राची कृपा असते, त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणि वैभव अधिक दिसून येतं, अशी मान्यता आहे. विशेष म्हणजे अशा मुलींच्या उपस्थितीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतात, असंही सांगितलं जातं. अनेक जण अशा मुलींना “घरची लक्ष्मी” असंही संबोधतात.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, नेमक्या कोणत्या तारखेला जन्मलेल्या मुलींविषयी ही मान्यता आहे?
अंकज्योतिषशास्त्रानुसार, महिन्याच्या ६, १५ व २४ तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक ६ मानला जातो. या मूलांकाच्या मुलींवर शुक्र ग्रहाची विशेष कृपा असल्याचं सांगितलं जातं. मात्र, हे सर्व ज्योतिषशास्त्रीय शक्यता आणि श्रद्धांवर आधारित असून, त्याकडे अंधविश्वासानं पाहू नये.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
