A Sign of Wealth and Prosperity for Fathers & Husbands : अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेला खूप महत्त्व आहे. जन्मतारखेवरून व्यक्तीचा मूलांक काढता येतो आणि त्यावरून तिचे व्यक्तिमत्त्व कळते. काही मूलांक कुटुंबासाठी खूप शुभ मानले जातात. विशिष्ट तारखांना जन्मलेल्या मुली त्यांचे वडील आणि नवरा दोघांसाठीही विशेषतः भाग्यवान असतात. अशा मुली जिथे राहतात, तिथे आनंद आणि सकारात्मकता नांदते असे देखील म्हणतात.
अंकशास्त्रानुसार जोपर्यंत या जन्मतारखेच्या मुली माहेरी राहतात, तोपर्यंत घरात संपत्ती आणि अन्नधान्याची कमतरता नसते आणि जेव्हा त्या लग्नानंतर सासरच्या घरी जातात. तेव्हा तिथेही त्या आनंद आणि समृद्धी घेऊन येतात. त्यांच्या आगमनाने घरात समृद्धी येते आणि प्रत्येक कार्यात यश मिळते. चला तर मग जाणून घेऊया की, कोणत्या मूलांकाच्या मुली विशेषतः भाग्यवान मानल्या जातात.
मूलांक १
जर एखाद्या मुलीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला असेल. तर तुमचा मूलांक १ मानला जातो. अंकशास्त्रानुसार, मूलांक १ हा सूर्याशी संबंधित आहे. तुम्ही आत्मविश्वासू, स्वतंत्र विचारांच्या आणि नेतृत्वगुण असलेल्या मानल्या जातात. असे मानले जाते की, लग्नानंतर, तुम्ही नवऱ्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम कुटुंबावर सकारात्मक परिणाम घडवून आणू शकते. अंकशास्त्रानुसार, वडील किंवा नवर्याच्या आयुष्यात तुमच्या एंट्रीने नवीन संधी आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते.
मूलांक ३
३, १२, २१ किंवा ३० तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक ३ मानला जातो. तुमचा मूलांक गुरु ग्रहाशी संबंधित आहे. तुम्ही बुद्धिमान, सकारात्मक आणि शिकण्यास उत्सुक मानल्या जातात. असे म्हटले जाते की, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आपल्या कुटुंबाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू शकता. तुमची सकारात्मक विचारसरणी आणि शहाणपण घरात सकारात्मक वातावरण टिकवून ठेवते. अंकशास्त्रानुसार, तुम्ही वडील आणि नवऱ्यासाठी करिअरमध्ये प्रगती आणि नवीन आर्थिक संधी घेऊन येता.
१२ तारखेला जन्मलेल्या मुलींना का मानले जाते खास?
१२ तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक ३ असतो. कारण – १ आणि २ यांची बेरीज ३ होते. अंकशास्त्रात या तारखेला विशेष महत्त्व दिले जाते. अंकशास्त्रानुसार, १ हा सूर्याचा तर २ हा चंद्राचा अंक मानला जातो. या दोन्हींची बेरीज ३ होते आणि ३ हा अंक गुरू ग्रहाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे १२ तारखेला जन्मलेल्या मुली आत्मविश्वासू, भावनिकदृष्ट्या समजूतदार आणि ज्ञान मिळवण्याची आवड असलेल्या असतात, असे अंकशास्त्रात मानले जाते.
