ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक धातूचा वेगळा प्रभाव असतो. शास्त्रात सोने धारण करण्याचे देखील अनेक फायदे सांगितले आहेत. तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी घातल्याने एकाग्रता वाढते, असे ज्योतिष शास्त्राचे तज्ज्ञ सांगतात. यासोबतच गुरु ग्रहाचाही शुभ प्रभाव पडतो. दुसरीकडे, अनामिकामध्ये सोन्याची अंगठी घातल्याने मुलांच्या आनंदातील अडथळे दूर होतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी सोन्याची अंगठी शुभ आहे.

सिंह :

ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी सोन्याची अंगठी खूप फायदेशीर असते. वास्तविक सिंह हे अग्नीच्या तत्वाचे चिन्ह आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या कारणामुळे या राशीच्या लोकांना सोन्याची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

तुळशीची सुकलेली पाने चमकावणार नशीब; जाणून घ्या कसा करावा वापर

कन्या :

कन्या राशीच्या लोकांना आरामदायक जीवन जगणे आवडते. ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते, कन्या राशीचे लोक सोन्याची अंगठी, चेन किंवा ब्रेसलेट घालू शकतात. याशिवाय या राशीवर सूर्याचा प्रभाव असल्याने या राशीच्या लोकांना सूर्याच्या शुभ प्रभावासाठी सोन्याची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो.

तूळ :

तूळ राशीच्या लोकांसाठी सोने शुभ मानले जाते. या राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्रासाठी सोने धारण करणे चांगले मानले जाते. याशिवाय सोन्याची अंगठी तूळ राशीच्या लोकांचे नशीब सुधारण्याचे काम करते.

धनु :

ज्योतिष शास्त्रानुसार धनु राशीच्या लोकांसाठी सोने धारण केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात. गुरु हा धनु राशीचा स्वामी आहे. सोन्याचा गुरूशी जवळचा संबंध आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांना सोन्याची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो. पण पायात सोने घालणे टाळावे.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)